आज सर्वजण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात घालवू इच्छितात. परंतु आजच्या या धावपळीच्या आयुष्यात हे शक्य नाही. कधीतरी कोणत्यातरी क्षणी प्रत्येकाला एकटे वाटते. जीवनातील येणाऱ्या समस्या काही कमी नाहीत. कोणाला नोकरीचे टेन्शन तर कोणाला घराचे तर कोणाला त्याच्या भविष्याचे. आयुष्य पुढे पुढे जात आहे परंतु जीवनातील समस्या काही कमी होत नाहीत.
म्हणूनच एकमेकांना हसवावे आणि स्वतःही आनंदी राहावे ज्यामुळे आयुष्यातील ताणतणाव कमी वाटतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी पुन्हा नव्याने उभा राहतो. हसल्यामुळे आपली समस्यांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. चला तर मग आपण येथे असे काही मजेदार विनोद बघणार आहोत, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.
१) निशा : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे? विशाल : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्याच्याकडून पाहिजे ते काम करून घेणे. निशा : चल खोटारडा कुठला याला तर बोयफ्रेंड म्हणतात. २) मास्तर : सांग गण्या तुझा जन्म कुठे झाला? गण्या : कोल्हापूर मास्तर : चल त्याची स्पेलिंग सांग बरं. गण्या थोडा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही माझा जन्म पुण्याला झाला.
३) निख्या : तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना! मग पत्र का पाठवलं? सोन्या : आधी मी तुला सतत फोनच करत होतो पण एक बाई मला सारखी फोनवर सांगत होती “प्लीज ट्राय लेटर”. ४) बाई : संदेश तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस? संदेश : बाई मी खूप गरीब घरचा आहे माझ्याकडे मोबाईल नाही आणि मला चॅटिंग करायला “Whatsapp” नाही.