एकदा उंदरांच्या टोळीची सभा भरते त्यावेळी पहिला उंदीर म्हणतो मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
त्यावर दुसरा उंदीर म्हणतो मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं रे कुठे चाललास?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन.
एक विवाहीत स्त्री आपल्या स्वत:च्याच जिभेवरती हळद, कुंकु आणि अक्षदा लावत होती. तेवढ्यात नवरा तिथे येतो आणि म्हणतो अगं हे काय करते आहेस.
बायको म्हणते :- अहो आज दसरा आहे ना म्हणुन मी माझ्या शस्त्राची पुजा करतेयं.
मुलगा मुलीला म्हणतो बघ मी आज तुझ्या केसांसाठी काय घेऊन आलो आहे.
मुलगी म्हणते सो स्वीट काय आणलं आहेस दाखव.
यावर मुलगा म्हणतो तुझ्या केसमधल्या उवा काढण्याची फणी.
दोन मित्र गप्पा मारत असतात त्यावेळी पहिला मित्र म्हणतो अरे माझी गर्लफ्रेंड फक्त गर्लफ्रेंड नव्हती देवी होती देवी
दुसरा मित्र : का रे असं काय केलं तिने
पहिला मित्र : लग्न झाल्यावर सासरी तर गेलीच पण स्वतःच सिमकार्ड मैत्रिणीला देऊन गेली.