‘संजू’ या चित्रपटात आपल्याला संजय दत्त बद्दल बरंच काही जाणून घ्यायला मिळाले. पण या चित्रपटात त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल एवढी माहिती भेटली नाही. आज आपण येथे संजय दत्तच्या तिन्ही पत्नींबद्दल माहिती घेणार आहोत. संजय दत्तच्या पहिल्या पत्नीचे नाव रिचा शर्मा आहे. रिचा ही संजयच्या जीवनातील महत्त्वाची व्यक्ती आहे. संजय आणि रिचा यांची भेट एका चित्रपटाच्या वेळी झाली. संजयने पहिल्यांदा रिचाचा फोटो एका मॅगझीन मध्ये पाहिला होता, तेव्हाच संजयला ती खूप आवडली.
त्यावेळी रिचा शर्मा १९८७ मध्ये ‘आग ही आग’ या चित्रपटाची शूटिंग करत होती. त्यावेळीच संजयने रिचाला प्रपोज केले पण रिचाने त्याचे काही उत्तर दिले नाही. संजय यानंतर तिला तोपर्यंत फोन करत राहिले जोवर तिने होकार नाही दिला आणि काही दिवसांनी त्यांचे लग्न झाले. त्यांना त्रिशाला नावाची एक मुलगीही आहे. काही वर्षांनी समजले की, रिचाला ब्रेन ट्युमर आहे. संजयने खूप प्रयत्न केले, परंतु ती वाचू शकली नाही आणि १९९६ मध्ये तिचा मृत्यु झाला.
त्यावेळी त्रिशाला आठ वर्षांची होती. त्रिशालाने तिचे शिक्षण न्यूयॉर्क मधून पूर्ण केले. ती एक उद्योजक आहे. संजयच्या दुसऱ्या पत्नीचे नाव रिया पिल्ले आहे, जी एक मॉडेल आहे. रियाचे आधी मायकेल वाझ बरोबर १९८४ ला लग्न झाले होते परंतु त्यांनी १९९४ मध्ये घटस्फोट घेतला. १९९८ साली संजय आणि रियाने लग्न केले. काही दिवसांनी या दोघांचाही काही कारणांमुळे घटस्फोट झाला. २००८ मध्ये संजय आणि रिया यांचा घटस्फोट झाला.
दिलनावाझ शेख म्हणजेच मान्यता दत्त जी एक अभिनेत्री, उद्योजक आणि आता संजय दत्त प्रोडक्शनची सिईओ आहे.२००८ मध्ये मान्यताचे संजय दत्त बरोबर लग्न झाले आणि अजूनही ते एकत्र राहत आहेत. मान्यताचेही आधी मेरज रहमान बरोबर लग्न होऊन घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी तिला शाहरान हा मुलगा आणि ईक्रा ही एक मुलगी अशी जुळी मुलं २१ ऑक्टोबर २०१० ला झाली. आत्ता संजय दत्त आपल्या कुटुंबाबरोबर आनंदाने आयुष्य जगत आहेत.