आपल्या भारत देशात निरनिराळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि याबरोबरच त्यांच्या बऱ्याच परंपरा, भाषा, नृत्य, गाणी यामध्येही विविधता आढळते. आपल्याकडे कोणताही कार्यक्रम असला की, बऱ्याच ठिकाणी मंडप टाकतात. काहीजण जेवण देतात त्याबरोबरच मनोरंजन करण्यासाठी इतर गोष्टी पण आयोजित करतात जसे की कोणी गाणे म्हणत असतो तर कोणी डान्स करतो.
असाच एक व्हिडिओ इथे तुम्हाला पाहायला मिळेल जो पाहून तुम्हालाही नाचायची इच्छा होईल. व्हिडिओत तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला समजेल की इथे एक बँड पथक त्यांचे कौशल्य दाखवत आहे आणि एक माणूस डान्स करत आहे. हा एवढ्या मोठ्या लोकांसमोर डान्स करणारा व्यक्ती त्या बँडमधला नाही. जर तुम्ही व्हिडिओ नीट बारकाईने पाहिले तर तुम्हाला समजेल की,
जेव्हा हे बँड पथक वाजवायला चालू करते तेव्हा तो गर्दीतूनच हात वर करत डान्स करत येत आहे. ज्यावेळी हा समोर येतो तेव्हा बँडमधले सुद्धा त्याला पाहू लागतात. बँड वरती वेसावची पारू हे कोळीगीत वाजवले जात आहे. तो व्यक्ती गर्दीतून नाचत येतो आणि बँडजवळ जेव्हा तो कोळीगीताच्या तालावर ठेका धरतो तेव्हा तुम्ही त्याला बघतच रहाल. दिसायला तो जरी जाड दिसत असेल तरी ज्या पद्धतीने तो डान्स करत आहे त्यावरून वाटते की डान्सर आहे.
आपल्याला आवड असेल तर त्यासाठी कोणी लाजत नाही. हा माणूस बिनदास्त डान्स करताना दिसत आहे. बँडवाल्यांना सुद्धा त्याला डान्स करताना पाहून अजून उत्साह येताना दिसत आहे. हे पथक एका विशिष्ट गणवेशात आहे आणि त्यांच्या वाजवण्यावरून तर ते त्या कलेत कुशल आहेत असे दिसत आहे. हे सगळे दृश्य पाहून एक माणूस तिथे आपल्याला कौतुक म्हणून बँडवाल्यांना पैसे देतानाही दिसत आहे.
हया व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हालाही नाचू वाटेल. बऱ्याच लग्न वऱ्हाडीत नवऱ्याच्या मिरवणुकीत तुम्हीही डान्स केला असेल. अशावेळी बरेच जण कसाही मनाला येईल तसं नाचतात काहीजण याला गणपती डान्स सुद्धा म्हणतात. तुम्हीही असे कधी विचित्र आणि वेडेवाकडे नाचून आनंद घेतला आहे का किंवा कोणाला पाहिले असेल?
पहा व्हिडीओ: