स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता खूप मनोरंजक अशा काही गोष्टी घडत असलेल्या दाखवल्या आहेत. दीपा, सौंदर्या, श्वेता, कार्तिक ही या मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा आहेत. तुम्ही मालिका पाहत असाल किंवा नसेल पाहत तर मी इथे तुम्हाला मालिकेबद्दल थोडे अपडेट देणारच आहे. दीपा ही अशी व्यक्तिरेखा आहे, जी मुलगी खूपच साधी सरळ आणि समंजस वृत्तीची आहे. घरातील माणसं जोडून ठेवण्यासाठी ती मनापासून प्रयत्न करत असते.
सध्या दीपा ही गरोदर आहे परंतु इकडे कार्तिकच्या मनात श्वेताने एक वेगळाच विचार रुजवला आहे की, तो कधीच बाप नाही बनू शकते जे खोटं आहे. दीपाला कार्तिककडूनच दिवस गेलेले असतात पण कार्तिक श्वेताने केलेल्या कारनाम्यामुळे गैरसमजात जगत आहे. खरंच दिपा ही व्यक्तिरेखा खूप छान पद्धतीने साकारली जात आहे.
मित्रांनो, तुम्हाला दिपाच्या खऱ्या आयुष्याबद्दल तसेच तिला काय काय आवडते हे माहिती आहे का? जर नसेल तर पुढे नक्कीच वाचा. दीपा हे पात्र अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारत आहे. रेश्मा ही मूळची मुंबईची आहे तसेच तिचे शिक्षणसुद्धा मुंबईमधूनच झाले आहे. तिचे लग्न अभिजित चौगुले बरोबर झाले आहे जो एक सिव्हिल इंजिनिअर आहे. दीपाचा या मालिकेतील रंग जरी काळा असला तरी ती खऱ्या आयुष्यात खूप गोरी आहे.
‘बंध रेशमाचे, लगोरी मैत्री, नांदा सौख्यभरे’ यांसारख्या मालिकांमध्ये अतिशय उत्तम अभिनय केला आहे. तसेच तिने मराठी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. ‘देवा एक अंतरंगी’ हा तिचा पहिला चित्रपट २०१७ मध्ये आला होता. ‘रंग हे प्रेमाचे, एक अलबेला, लालबागची राणी’ यांसारख्या चित्रपटात सुद्धा तिने काम केले आहे. रेश्माला अभिनयाबरोबरच डान्सचीही खूप आवड आहे. ती अतिशय उत्तम डान्स करते.
या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तिला डान्स करताना पाहाल तर तुम्हाला समजून येईल की दीपा किती उत्तम डान्स करते. तिची प्रत्येक डान्स स्टेप ही सुंदर आहे. व्यक्तीने जीवनात बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात. फक्त एकच गोष्ट येते म्हणून तीच करत राहणं हे योग्य नाही. तसेच रेश्मा सुद्धा करत आहे. अभिनयाबरोबरच तिने डान्ससुद्धा उत्तम प्रकारे शिकला आहे. तुम्हाला दीपा म्हणजेच रेश्माचा डान्स कसा वाटला, आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: