भाताची चव चौपट वाढेल, मोकळा भात बनवण्याची सोप्पी पद्धत,तांदूळ शिजवताना त्यात टाका ही एक वस्तू!

कलाकार

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लांब मोठे सुटसुटीत सफेद तांदूळ घरी कसे शिजवायचे? हे बनवायला अतिशय सोपे आहे. याच्या काही ट्रिक्स असतात ज्या आम्ही आज तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. बऱ्याच जणांची ही तक्रार असते की भात चिकट होतो, मऊ सूटा होत नाही. बाजारातल्या प्रमाणे सफेद होत नाहीत. पाहुयात सुटसुटीत भात कसा शिजवायचा?

250gm लांब तांदूळ, अर्ध लिंबू, चवीनुसार मीठ, एक चमचा साजूक तूप, पाणी.. हे सामग्री गोळा करून घ्या. आपण घेतलेले तांदूळ दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. असं केल्याने तुमचे तांदूळ स्वच्छ धुतले जातीलच परंतु तांदूळचा भात शिजताना लांब होईल. सोबतच सुटसुटीत आणि सफेद होईल. तांदूळ ओला होऊन भिजून त्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जाईल.

स्टार्च निघून गेल्यामुळे तांदूळ म्हणजेच होणारा भात चिकट होत नाही. तांदूळ दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्या. त्यातील पाणी काढून टाका. आता ते तांदूळ अर्धा तासासाठी पाण्यात तसेच भिजत ठेवा. अस केल्यामुळे तुमचा भात हा सुटसुटीत, सफेद, लांब होईल. त्याचा अजून एक फायदा म्हणजे तांदूळ शिजण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. त्यामुळे गॅसची बचत होते.


पाणी गाळून घ्या. तांदूळ वेगळे करा. जेवढे तांदूळ असतील त्यापेक्षा एक ग्लास जास्त पाणी घेऊन, ते पाणी एका कढईमध्ये गॅस वर गरम करायला ठेवा. तांदुळ उकळायचे आहेत त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त असेल तर त्याने आपल्याला फरक पडणार नाही. तांदूळ पेक्षा थोडे जास्तच पाणी घेतल्याने तांदूळ चांगल्या पद्धतीने शिजतील.

पाणी चांगले गरम होऊ द्यावे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे. त्यात आपण तांदूळ घाला आणि हलवा. झाकण ठेवून बंद करावे. अर्धे शिजत आले आहे असं दिसल्यास त्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला. दोन मिनिट पुन्हा झाकण बंद करून शिजवा. दोन ते तीन मिनीटानंतर गॅस बंद करावा. आपले लांब तांदूळ तयार शिजून..! त्याला चाळणीने गाळून घ्या. पाणी पूर्ण वेगळे करा. हा भात थंड होऊ द्या. त्यात एक चमचा साजूक तूप घालावे. यामुळेच तर छान येतेच सुगंधही येतो शिवाय तांदूळ चमकदार दिसतात. चमच्याने हलक्या हाताने हलवून घ्यावे. सुंदर, सूटसुटीत, मऊ, सफेद, लांब भात तयार! आता तुम्ही बाजारातल्या प्रमाणे घरच्या घरी असा भात बनवू शकता.