गुलाबाचे झाड दोनच दिवसात हिरवेगार होऊन फुलांनी भरून जाईल,फक्त एक रुपयांची ही एक वस्तू गुलाबाच्या झाडाला टाका …!!

कलाकार

मित्रांनो गुलाबाची छान मोठी, टवटवीत फुलं आपल्या बागेत बघितली तरी मन फ्रेश होऊन जातं. केशरी, गुलाबी, अबोली, पांढरा, पिवळा असे अनेक रंगाचे गुलाब मन मोहून घेतात. गावरान गुलाबांना तर देखणं रूप असतंच, पण सोबतच त्यांचा सुवासही अत्यंत आल्हाददायी असतो. जर काही गोष्टींची थोडीफार काळजी घेतली, तर गुलाबाची रोपं बागेत वाढवणं तसं काही फार अवघड काम नाही. कधी- कधी काहीतरी आपल्याकडून नकळतपणे होऊन जातात आणि मग बागेतले गुलाब सुकून जातात. म्हणूनच गुलाबाच्या झाडांची काळजी घेण्यासाठी या काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे.

आणि मित्रांनो ज्यावेळी आपण आपल्या गुलाबाच्या झाडाची व्यवस्थितपणे निगा राहतो आणि त्याला खत पाणी घालतो तेव्हा गुलाबाचे झाड हे खूप चांगले येते परंतु मित्रांनो अनेक वेळा जास्त उन्हामुळे किंवा जास्त पाणी घातल्यामुळे गुलाबाच्या झाडांवर कीड पडते आणि त्यापासून कशा पद्धतीने बचाव करायचा हे आपल्याला कळतच नाही तर मित्रांनो आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या गुलाबाच्या झाडाची निगा कशा पद्धतीने राखली पाहिजे आणि जेव्हा त्याच्यावर कीड पडेल किंवा इतर रोग येतील तेव्हा त्यावर काय उपाय केले पाहिजेत याबद्दलची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गुलाबाच्या रोपाची माती तपासाकोणतेही झाड आणि विशेषत: गुलाबाचे झाड तेव्हाच चांगले टिकते, जेव्हा त्याची माती चांगली असते. म्हणूनच गुलाबाच्या कुंडीत असणाऱ्या मातीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गुलाबाचे झाड लावण्यासाठी कडक माती कधीच वापरू नका. भुसभुशीत माती निवडा. नुसती काळी मातीही गुलाबाचे रोप लावण्यासाठी कधीच वापरू नये. या मातीत थोडे कोकोपीट आणि अगदी थोडी वाळूदेखील टाकावी. गुलाबाचे रोप लावल्यानंतर सुरूवातीचे दोन- तीन दिवस ते कधीच कडक उन्हात ठेवू नका. जर तुम्ही नर्सरीतून गुलाबाचे रोप आणले असेल, तर ते त्याच पिशवीमध्ये न ठेवता लगेच कुंडीत लावावे.

आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे शेणाचा उपयोगजर गुलाबाला चांगली फुले येत नसतील, तर त्याची माती सगळ्यात आधी बदलून टाका. नवी माती टाकताना कुंडीत सगळ्यात खाली थोडी वाळू टाका. त्यानंतर माती टाका. या मातीत थोडे शेणदेखील टाकावे. गुलाबाच्या रोपांसाठी शेण हे सगळ्यात चांगले खत समजण्यात येते. कुंडीतली माती कडक होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. माती कडक झाली आहे, असे वाटले तर ती हलक्या हाताने उकरून भुसभुशीत करून घ्या. आणि मित्रांनो तुम्ही हे शेण जेव्हा वापरणार आहात तेव्हा ते व्यवस्थितपणे वाळवून मातीमध्ये मिक्स करून मगच त्याचा वापर करायचा आहे.


आणि मित्रांनो गुलाबासाठी असे बनवा खतगुलाबाच्या रोपांसाठी घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने खत बनविता येते. वाळलेले शेण आणि संत्री, लिंबू, मोसंबी अशा फळांची साले एक बादली पाण्यात दोन ते तीन दिवस राहू द्या. यानंतर या पाण्यात अर्धा बादली चांगले पाणी टाका आणि हे पाणी गुलाबाच्या झाडांना द्या. पानांवर देखील हे पाणी शिंपडा. हा प्रयोग आठवड्यातून एकदा केला तर तुमचे गुलाबाचे झाड नेहमीच आकर्षक फुलांनी बहरलेले असेल. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर मार्केटमध्ये मिळणाऱ्या विविध खतांचा वापर करून सुद्धा तुम्ही गुलाबाच्या झाडाची कीड किंवा रोड नष्ट करू शकता यासाठी तुमच्या घराजवळ असणाऱ्या कृषी सेवा केंद्र मध्ये किंवा औषधाच्या दुकानामधून तुम्हाला ही रोगनाशक औषधे घेऊन यायचे आहेत आणि त्याचा सांगितलेल्या पद्धतीने वापर करायचा आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलाबाचे जे झाड आहे तेकडक उन्हात ठेवू नका गुलाबाचे रोपटे कधीच कडक उन्हात ठेवू नका. अनेक झाडांच्या वाढीसाठी ऊन लाभदायी असते. पण गुलाबासाठी अगदी कडक उन चांगले नाही. त्यामुळे तुमच्या गुलाबाच्या कुंडीवर जर थेट कडक ऊन येत असेल, तर त्याची जागा बदला. या झाडाला दिवसातला काही काळ ऊन मिळाले तरी ते पुरेसे ठरते.