आपल्या सर्वांची आवडती गायिका जीने आजपर्यंत खूप सुपरहिट गाणी गायली आहेत ती आता आई होणार आहे. या गायिकेने सुपरहिट हिंदी चित्रपट ‘देवदास’ जो २००२ मध्ये आला होता त्यासाठी गायले आहे आणि तिला यासाठी नॅशनल अवॉर्ड सुद्धा भेटला आहे. ‘देवदास’ मध्ये तिने सिलसिला ये चाहत का, बैरी पिया, मोरे पिया आणि डोला रे डोला ही गाणी गायली आहेत. एकाच चित्रपटात तिने ४ गाणी गायली.
ही गायिका दुसरी कोणी दिसून आपल्या सर्वांची आवडती श्रेया घोशाल आहे. श्रेयाने तिच्या गरो’दर’पणाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. श्रेया ही दिसायला सुंदर आहेच परंतु या फोटोमध्ये आणि येणाऱ्या पाहुण्याच्या आनंदात तिचे सौंदर्य अजूनच खुलून आले आहे. तिने पोस्ट करून सांगितले होते की, ‘बेबी, श्रेयादित्य आता लवकरच येणार आहे. मी आणि शिलादित्य दोघेही खूप आनंदी आहोत.
जीवनातील या नव्या सुरूवातीसाठी तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद लाभु द्या.’ तिने तिचे अजून बरेच फोटोस शेअर केले आहेत. नुकतंच एक फोटो शेअर केला ज्यावर तिने लिहिलं होतं की, ‘आयुष्यातील सर्वांत महत्वाच्या गोष्टीचा अनुभव घेत आहे. तो देवाचा एक चम’त्कार.’ हा फोटो कोणी दुसऱ्या फोटोग्राफरने काढला नसून तिच्याच नवऱ्याने म्हणजेच शिलादित्य मुखोपाध्यायने काढला आहे.
या पोस्टसाठी दिया मिर्झा, नीती मोहन, हर्षदीप कौर जे आत्ता नुकतेच आईवडील झाले आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर श्रेया आणि शिलादित्य यांनी ५ फेब्रुवारी २०१५ ला लग्न केले. घरातील सर्वचजण या नवीन येणाऱ्या पाहुण्याची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
श्रेयाने ‘परिणीती मधील पीयू बोले पिया बोले, जिस्म मधील जादू हे नशा है, गुरू मधील बरसो रे मेघा, मनवा लागे तसेच घर मोरे परदेसिया’ अशी अनेक गाणी गायली आहेत. या नवीन येणाऱ्या पाहुण्यासाठी आपणही त्यांना शुभेच्छा आणि भरपूर प्रेम देऊयात.