या बुटक्या जोडीचा विवाह चा व्हिडीओ होत आहे वायरल

कलाकार

जगात बरेच लोक, निरनिराळ्या परंपरा आणि त्यानुसार लोकांचे राहणीमान आहे. व्यक्तींमध्ये सुद्धा विविधता आहे, कोणी उंचीला मोठं तर कोणी लहान, कोणी जाड तर कोणी सडपातळ, कोणी काळा तर कोणी गोरा. एवढे वेगळेपण असतानाही सर्वजण एकत्र राहतात परंतु यामध्ये काही व्यक्ती अपवाद सुद्धा असतात.

आपण सर्वसामान्य लोकांकडे म्हणजेच उंचीला बरोबर, चालता बोलता येते तसेच सर्वसामान्य रंग यांच्याकडे एवढे बारकाईने लक्ष देऊन बघत नाही. परंतु तेच जर का कोणी असामान्य असेल म्हणजेच उंचीला कमी किंवा खूपच काळा किंवा थोडक्यात आपल्यापेक्षा वेगळा दिसणारा असला की लोक त्यांकडे एकटक पाहत असतात. असे करणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते.

लहान उंचीच्या माणसांना आधीच बऱ्याच अडचणी येत असतात, काही तर मनानेसुद्धा खचलेले असतात की आपण सामान्य माणसांसारखं नाही जन्माला आलो आणि जर आपण त्यांना वेगळी वागणूक देत राहिलो तर त्या व्यक्ती अजून खचतील. अशीच एक लहान उंचीची जोडी आहे ती म्हणजे पायल ठवाणी आणि कपिल बजाज या दोघांची. तुम्ही कदाचित यांना सोशल मीडियावर पाहिले सुद्धा असेल.

हे दोघेही व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर तुमची करणमूक सुद्धा करतात. यांनी आपल्या कमी उंची असण्याचा कमीपणा कधी मनात बाळगला नाही आणि नेहमी पुढे चालत राहिले. या दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे आणि इंदोर मध्ये स्थायिक आहेत. लग्न तर बरेच धुमधडाक्यात साजरे झाले. लग्नात पायलने कपिल साठी लेहेंगा गाण्यावर डान्स सुद्धा केला आणि ती सुंदर नाचते.

लग्नानंतर या दोघांनी त्यांचा एक चॅनेल सुद्धा बनवला आहे आणि त्यांच्या हनीमूनचे अपडेट सध्या ते दोघे व्हिडिओमार्फत देत आहेत. ही लहान उंची असणाऱ्यांना एक चांगले असे उदाहरण आहे ज्यामुळे ते आयुष्याला एका चांगल्या नजरेने आणि पद्धतीने जगू शकतात. सर्वसामान्य माणसं जशी जगतात तसच त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. तुम्हालाही पायल आणि बजाज यांच्याबद्दल काय वाटते? किना लहान उंची असणाऱ्यांबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *