‘फुलाला सुगंध मातीचा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडली आहे. या मालिकेत जिजीआक्काची सून म्हणजेच किर्ती आणि तिचा नवरा शुभम यांचे आता हळुवारपणे प्रेम फुलत चालले आहे. मालिकेत असे दाखवले आहे की, जिजीआक्काला किर्ती ही सून म्हणून नको असते कारण तिला घरातले कामही येत नसते आणि जास्त शिकलेलीसुद्धा असते.
घटस्फोटच्या पेपर्समुळे शुभम दुखावला जातो आणि तो किर्तीला घरातून बाहेर काढतो. परंतु शिर्डी मुंबई रोडवरील अपघाताच्या धक्क्यामुळे कीर्ती आणि शुभम दोघेही एकत्र येतात आणि त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम सुद्धा ते व्यक्त करतात. आता पुढे कीर्ती शुभमबरोबर किती प्रेमाने वागते हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये समजूनच येईल. शुभम म्हणजेच अभिनेता हर्षद अत्कारी याचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले आहे.
शुभम हा दिसायला खूप हँडसम आहे. अभिनेत्री ऐश्वर्या शेटे ही कीर्तीचे पात्र साकारत आहे. ऐश्वर्याने याआधीही अनेक मालिका केल्या आहेत. तर नुकतंच शुभम आणि ऐश्वर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. या व्हिडिओत तुम्ही त्यांना एकत्र डान्स करताना पाहिले असेल. ऐश्वर्याला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे आणि मालिकेच्या शूटिंग दरम्यान राहिलेल्या वेळात काढलेले तिचे डान्सचे व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच पाहिले असतील.
ती उत्तम डान्स करते. या दोघांच्या व्हिडिओमध्ये त्यांना कोरिओग्राफर डान्स शिकवत आहे. शुभम सुद्धा किर्तीबरोबर चांगला डान्स करत आहे. तुम्हाला या दोघांचा डान्स कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच शुभम आणि कीर्ती यांची जोडीही तुम्हाला कितीपत आवडते? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
पहा व्हिडीओ: