प्रत्येक व्यक्तीचे वेगळेवगळे आवडते छंद असतात. कोणाला चित्र काढायला आवडते तर कोणाला गाणी गायला, कोणाला डान्स तर कोणाला फिरायला. असे अनेक निरनिराळे छंद व्यक्तीला असतात. लहान असताना आपण बऱ्याच वेगळ्यावेगळ्या गोष्टी करत असतो आणि त्यातूनच आपल्याला समजते की कोणती गोष्ट आपल्याला जास्त आवडते. यालाच आपण छंद असेही म्हणतो.
काहीजण याच छंदाला जोपासतात आणि त्यात करिअरसुद्धा करतात. तुम्हीही जेव्हा शाळेत किंवा कॉलेजमध्ये असाल त्यावेळी पाहिले असेल की, मुलेमुली खूप निरनिराळ्या गोष्टी करतात. कोणी गाणे तर कोण डान्स तर कोण वेगळेवगळे कार्यक्रम मॅनेज करण्यात पटाईत असतात. कॉलेजच्या वयात असताना आशा गोष्टी प्रत्येकालाच करू वाटतात.
काही कॉलेजवर अवलंबून असते की, कॉलेजमध्ये काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मुलांच्या आवडीवर सुद्धा अवलंबून आहे की ते आशा गोष्टींना किती प्रतिसाद देतात. आज तुम्हाला असाच एक व्हिडिओ इथे पाहायला मिळेल. यात काही मुले आणि मुली डान्स करत आहेत. व्हिडिओवरून असे दिसून येत आहे की, दोन ग्रुपमध्ये डान्स स्पर्धा चालू आहे आणि शेवटी यात कोणीतरी जिंकेल किंवा हारेल.
जेव्हा पहिल्या ग्रुपची वेळ येते तेव्हा सगळ्या मुली डान्स करत पुढे जातात परंतु नंतर एकच मुलगी जी काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे ती डान्स करते. तीने केलेला डान्स खूप उत्तम आहे आणि सगळेजण डान्स बघून आश्चर्य करत आहेत. दुसऱ्या ग्रुपमधून सुद्धा मुलगी येते आणि तिच्याबरोबर मुले मुली येतात. ती सुद्धा छान डान्स करते आणि शेवटी आलेला मुलगाही. यांचा डान्स बघून तुम्हालाही उठून डान्स करण्याची इच्छा झाली असेल.
बरोबर ना? मित्रांनो हा व्हिडिओ आयआयटी कानपूर कॉलेजमधील आहे. आयआयटी कॉलेज हे एक चांगल्या प्रतीचे शिक्षण देण्यासाठी नामांकित आहे. अशा कॉलेजमध्ये लवकर प्रवेश मिळत नाही यासाठी मुलांना खूप अभ्यास सुद्धा करावा लागतो. परंतु अभ्यासबरोबरच बाकी क्षेत्रात सुद्धा मुलांनी पुढे जायला पाहिजे तसेच आपले छंद आवड हे शुद्ध जपले पाहिजे, हे या कॉलेजच्या व्हिडिओमधून दिसत आहे. तुम्हीही कॉलेजमध्ये अशा काही अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टी केल्या असतील तर त्या क्षणांना इथे व्यक्त करून तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्या.
पहा व्हिडीओ: