लग्नसोहळा असला की डॉल्बी, बेंजो, बँड, गाणी अश्या गोष्टी येतातच. हौशी तसेच श्रीमंत कुटुंब असले की लग्न वरातीसाठी बँड आणि गाणे म्हणणारे सुद्धा असतात. या व्हिडिओत जर तुम्ही पाहाल तर एक मुलगी लावणी म्हणत आहे आणि बाकीचे वाद्य वाजवत आहेत. गावाच्या बाजूला असे बँड तुम्हाला सहसा करून पाहायला मिळतील.
अशा बँडला लग्नकार्यासाठी गावाकडे खूप मागणी असते. व्हिडिओतील ही मुलगी तसं पाहायला गेलं तर जास्त मोठीही नाही. परंतु परिस्थिती व्यक्तीला काम करण्यासाठी भाग पाडते. पोटासाठी पैसे कमवायला म्हणूनही ती कदाचित या बँडसाठी गाणे म्हणत असेल किंवा तिची एक आवड आहे म्हणून सुद्धा ती गाणे म्हणत असेल. तिचा आवाजही सुंदर आहे. या व्हिडिओत ती ‘ढोलकीच्या तालावर’ ही लावणी म्हणत आहे.
या बँडचे नाव संगम बँड आहे. जळगाव जिल्ह्यातील देवगाव येथील हे बँड आहे. ही मुलगी ‘ढोलकीच्या तालावर’ हे गाणे एका लग्नकार्यासाठी गात आहे. जेव्हा बँड एखाद्या गाण्यासाठी वाद्य वाजवते तेव्हा तो वाजवणारा सुद्धा त्या तालावर नाचत वाजवत असतो. संगम बँड विविध कार्यक्रमासाठी वाजवले जाते तसेच बऱ्याच गावात सुद्धा यासाठी मागणी असते.
काही गावांत यात्रेच्या वेळीसुद्धा तसेच गणपती उत्सवाच्या वेळी असे बँजो किंवा डीजे पूर्ण गावातून फिरत असतात आणि बरेच लोक यांनी गायलेल्या तसेच वाजवलेल्या गाण्यावर नाचत असतात. काहींमध्ये तर एकच माणूस दोन आवाजात गाणे म्हणतो म्हणजेच माणूस बाईचाही आवाज काढतो. तुम्हीही असे बँड किंवा डीजेवाले पाहिले आहेत का जे तुमच्या अजूनही लक्ष्यात आहेत किंवा काही ठिकाणी तुम्हीही डान्स केला असेल. तुमचे हे क्षण आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नका आणि त्यासाठी कमेंट नक्की करा.
पहा व्हिडीओ: