लालबाग च्या या चिमुकलीने झिं’गाट गाण्यावर सर्वाना नाचवलं

कलाकार

महाराष्ट्र म्हणलं की कोणत्याही समारंभात डॉल्बी किंवा डीजे हा असणारच. लग्नकार्य असो वा कोणती मिरवणूक किंवा कोणता सण जसे की गणपती, दसरा अशावेळी सगळीकडे आपण डीजे किंवा डॉल्बी लावलेली पाहतो. गणेशोत्सव हा सगळ्यांच्याच आवडीचा सण आहे. यावेळीही गणपती आगमन आणि गणपती विसर्जनच्या वेळी गणपतीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते.

असाच आहे आपला लालबागचा राजा. इथेही एक बँड पथक आहे त्यामधील एक व्हिडिओ सध्या खुपच वायरल होत आहे. काही वर्षांपूर्वी गाजलेला ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील गाणी अजूनही डीजे वर वाजवली जातात आणि कितीही वेळा ऐकले तरी या गाण्यांचा कोणाला कंटाळा येत नाही. या व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर सैराट मधीलच ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणं वाजवल जात आहे.

यामध्ये एक चिमुकली कीबोर्डवरती संगीत देत आहे. आजकालची लहान मुले खूप हुशार आहेत हे याचे अजून एक उदाहरण आहे. एखाद्या मोठ्या आणि अनुभवी व्यक्तीसारखं ही छोटीशी मुलगी कीबोर्ड वाजवत आहे. जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाल तर तुम्हाला समजेल की तिथे एवढी गर्दी आहे आणि त्या गर्दीतही ती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या आजूबाजूचे सर्वजण तिच्याकडे बघत आहेत आणि व्हिडिओ तसेच फोटो काढत आहेत.

आजूबाजूला एवढ्या गोष्टी होत असताना देखील ही मुलगी घाबरत नाहीये आणि निडर होऊन बिनदास्तपणे कीबोर्ड अगदी सुरात वाजवत आहे. यावरूनच येणारी नवीन पिढी ही अतिशय हुशार आणि धीट आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *