मित्रांनो, बँजो म्हणलं की, तो आपण ऐकलेला आवाज आणि तो धरलेला ठेका आठवून पुन्हा नाचावे असे मनात येते. बँजोचे सूर कानात अजून एकदा ऐकू येतात. बँजो हा असाच आहे, जो एकदा का आपण ऐकला की ते त्यावेळी निर्माण झालेले वातावरण सहजासहजी विसरले जात नाही. तुम्हाला कधी असे झाले आहे का, बँजोच्या तालावर तुम्ही एक गाणे ऐकले असेल आणि घरी आल्यावर तेच गाणे तुम्ही टीव्हीवर किंवा मोबाईलवर खूपदा ऐकले आहे?
माझ्या बाबतीत तर असं खूपवेळा घडतं. जेव्हा कधी मी बँजोवर एखादे गाणं ऐकतो तेव्हा घरी आल्यावर तेच गाणं मी बऱ्याचदा ऐकले आहे. आज इथेही असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला आहे जो ऐकून तुम्हाला उठून नाचायचं मन करेल. व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला समजेल की मी असे का म्हणत आहे. या व्हिडिओत एक छोटा मुलगा चक्क बँजो मधील ड्रम वाजवत आहे.
हा ड्रम वाजवायचा असेल तर कोणी नवीन मुलगा सहजच वाजवू शकत नाही. त्यासाठी कौशल्य आणि अनुभव लागतो. या मुलाला जर तुम्ही पाहिले तर बघून असे वाटत नाही की याला ड्रम वाजवण्याचा एवढा अनुभव असेल. हा मुलगा खूप लहान आहे परंतु तुम्ही जर त्याची ड्रम वाजवण्याची कला बघाल तर पाहून दंग राहाल.
तो ड्रम वाजवताना एखाद्या कुशल ड्रम वाजवणाऱ्यासारखा वाजवत आहे आणि तेवढ्याच स्टायल मध्ये सुद्धा. व्हिडिओतील या बँजोमध्ये त्या ड्रमवर ‘गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये’ हे गाणं वाजवल जात आहे. ड्रम वाजवणाऱ्या मुलाएवढीच मुले त्याच्या आजूबाजूला नाचत आहेत. त्याच्या अवतीभोवती एवढी गर्दी असूनही हा छोटा मुलगा घाबरत नाहीये उलट आत्मविश्वासाने अजून जोशात येऊन तो वाजवत आहे.
आत्ताच्या लहान मुलांना हे कर, ते कर म्हणायची गरज नाही लागत. ते स्वतःहूनच अशा नवीन नवीन गोष्टी शिकत असतात. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला आणि ड्रम ऐकून तुम्हालाही याच्या तालावर मान हलवावीशी वाटली का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: