पुण्याची मैना गाण्यावर या मुलींचा नाच होत आहे वायरल

कलाकार

आज बरेच डान्सर्स आणि त्यांच्याबरोबरच नवीन डान्स प्रकार सुद्धा निघाले आहेत. प्रत्येकजण त्याचा डान्स प्रकार कसा चांगला आहे आणि तो बाकी लोक जास्तीत जास्त कसा फॉलो करतील, याकडे बघत असतात. त्यातच युट्युब हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्व कलांचे स्वागत केले जाते. युट्युबवर तुम्हाला खूप ज्ञान मिळते जे तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे सुद्धा नाही सांगू शकत.

ज्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल ते सगळे तुम्हाला युट्युब वर मिळेल. आता बऱ्याच डान्स अकॅडमी निघाल्या आहेत आणि त्यामुळे आता बरेचजण डान्स शिकू शकत आहेत. असाच एक व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जिथे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिला तर पुन्हा पुन्हा पाहू वाटेल. यामध्ये तुम्हाला पाच मुली डान्स करताना दिसतील आणि त्या ‘मला म्हणतेत पुण्याची मैना’ या गाण्यावर डान्स करत आहेत.

त्या मुलींची स्टायल पाहिली तर ती वेगळी आहे. त्यांनी वेस्टर्न कपडे घातले आहेत परंतु त्यावर वेगळ्यावेगळ्या रंगाची ओढणी घेतली आहे. तसेच या कपड्यांवर त्यांनी शुज म्हणजेच बूट घातले आहेत. यांची स्टायल जरा वेगळीच आहे त्यामुळेही कदाचित या व्हिडीओला एवढी पसंती मिळत आहे. हा व्हिडीओ चालू झाल्यावर एक मुलगाही तुम्हाला दिसेल कदाचित तो त्यांचा कोरिओग्राफर असावा.

हा डान्स करणाऱ्या मुलींची नावेही या व्हिडिओत दाखवली आहेत तसेच यांच्या कोरिओग्राफरचे नाव अनिकेत गायकवाड आहे. हे एक मराठी कोरिओग्राफर आहेत. यांच्या अकॅडमीचे नाव ‘रायसिंग स्टार डान्स अकॅडमी’ आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *