या जगातील आपल्या सर्वात जास्त जवळची व्यक्ती कोणी असेल तर ती म्हणजे आई आहे. आईचे नाते असे आहे की जे दुसरी कोणतीही व्यक्ती निभावू शकत नाही. आई आणि तिच्या मुलांची माया हे फक्त तेच जाणू शकतात. आई एवढी तुमची काळजी या जगात कोणीच नाही घेऊ शकत. जेव्हा आई जवळ असते तेव्हा बऱ्याच जणांना तिची किंमत नाही कळत.
परंतु जेव्हा तुम्ही तिच्यापासून लांब जात तेव्हा तुम्हाला तिची आणि तिने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टींची आठवण येऊन रडू येते. म्हणूनच जोवर तुम्ही आईबरोबर आहे तोवर नीट रहा. आई ही तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवून जन्म देते आणि त्यामुळेच तिच्याशिवाय तुम्हाला काय वाटते, काय पाहिजे , कोणती गोष्ट करू वाटत आहे हे कोणीच नाही समजून घेऊ शकत.
आपल्या आईला न सांगताही आपल्या बोलण्यावरून सर्व गोष्टी कळत असतात. खरंच तिच्यासारखं जवळच आणि समजून घेणार कोणीही नसत. कितीही तिच्या मुलाने चुका केल्या तरीही ती त्यांना पदरात घालते आणि पुन्हा तिच्या मुलाकडे जाते. असेच एक गाणे आज तुम्हाला ऐकवणार आहे जे आईवर आधारित आहे. या गाण्याचे नाव आहे ‘ये ना माझे आई ग’. हे गाणे ऐकून तुम्हालाही तुमच्या आईला आठवून रडून येईल.
आई या नात्यावर कोणीही कितीही बोलू शकतो आणि लिहू शकतो परंतु त्याहीपेक्षा आईची माया नेहमी जास्तच असते. तुम्हाला काहीही झाले तरी तुमची आई नेहमी पाठीशी असते. तुमच्या आयुष्यात ती तुमची आई तर असेलच त्याबरोबरच तुमची मैत्रीण, एक चांगली आयुष्याची साथीदार, एक मार्गदर्शक असते जी तुम्हाला नेहमीच बरोबर मार्ग दाखवते. खरंच ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे वाक्य आईसाठी बरोबर आहे.
पहा व्हिडीओ: