लग्नकार्य असले की नवरानवरीला बरेचजण गिफ्ट म्हणजेच भेटवस्तू देतात. घरातील बरीच पाहुणे मंडळी असतात जे त्यांच्या परिस्थितीनुसार ज्या वस्तू द्यायच्या किंवा पैसे द्यायचे ते लग्नात भेट म्हणून देतात. परंतु जसजसं काळ पुढे जात आहे आणि नवीन पिढी येत आहे तसे लग्नाचे स्वरूप तसेच बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. हे तुम्हालाही मान्य असेल.
आता सर्रास करून लग्नाच्या आधी फोटोशूट करतात ज्याला प्रिवेडिंग फोटोशूट म्हणतात आणि लग्न जवळ आले की एक एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. लग्नात ड्रोनच्या साहाय्याने सुद्धा आता व्हिडिओ बनवले जातात. तर कुठे लग्नात नवरा किंवा नवरी किंवा काही ठिकाणी नवरानवरी दोघेही एकमेकांसाठी डान्स करतात.
याबरोबरच आता एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे आणि त्याबद्दल तुम्ही पुढे जाणून घेणार आहेत. लग्नात गिफ्ट देताना अशा वस्तू गिफ्ट द्याव्यात हे तुम्हाला कधी सुचलेही नसेल अशा भेटवस्तू इथे तुम्हाला नवरा नवरीला त्यांचे मित्रमंडळी देताना दिसतील. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून यांनी काय काय गिफ्ट दिले आणि कशा प्रकारे मित्रमैत्रिण ते गिफ्ट देण्यासाठी नवरानवरीकडे चालत जातात हेही दिसेल.
जर तुम्ही व्हिडिओत पाहिले तर तुम्हाला दिसेल या उत्सवमूर्तींना सुपली तसेच भांड्याचा साबण आणि घासणी तसेच शाम्पूपुड्या आणि कोलगेट ब्रश तर कोणी घर साफ करायच्या वस्तू तसेच बाथरूम टॉयलेट साफ करण्यासाठी हार्पिक ब्रश सुद्धा देताना दिसत आहेत. या भेटवस्तू मिळत आहेत हे पाहून नवरानवरी दोघेही खूप हसत आहेतच तसेच बाकीचेही असे गिफ्ट्स पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
खरोखर या नवीन पिढीला काय काय अशा नवीन कल्पना सुचतील नाही सांगू शकत. या सगळ्यांनी त्या लग्नात खूपच मजा केली आहे. तुमच्याकडेही तुमच्या मित्रमैत्रिणीच्या लग्नात भेटवस्तू देण्यासाठी अशी काही भन्नाट कल्पना आहे का? किंवा कधी कुठे असे पाहिले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: