हो आम्ही देशमुख आहोत आम्ही अजिबात पदर खाली पडू देत नाही

कलाकार

आजकालची लहान मुले ही त्यांना काही न सांगता, न शिकवता बरंच काही स्वतःहून करतात. तुम्हीही लहानमुलांना घरातल्या व्यक्तींची नक्कल करताना पाहिले असेलच की. ती लहान, गोंडस मुलं एवढ्या छान प्रकारे नक्कल करतात की त्यांना खूप पापे घ्यावेसे वाटतात, काहीजण तर कोणाची नजर लागू नये म्हणून दृष्ट सुद्धा काढतात.

असाच एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ इथे तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तो व्हिडिओ बघून हसायला तर येईलच त्याबरोबरच ती मुलगी सुद्धा तुम्हाला खूप आवडायला लागेल. तुम्ही घरी किंवा आजूबाजूला रोजच महिलांचा ग्रुप गप्पा मारताना पाहिला असेल आणि कधी कधी तर त्या बायका एवढे विनोद करतात की त्यांच्या हसण्याचा आवाज सगळीकडे ऐकायला जातो.

तुम्हीही अशा बायकांच्या काही गमतीजमती पाहिल्या किंवा ऐकल्या असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. इथेही या व्हिडिओत असेच काहीसे तुम्हाला पाहायला मिळेल परंतु इथे एक लहान मुलगी साडी घालून गप्पा मारायला आलेल्या बाईचा अभिनय करत आहे. तीने उत्तमरीत्या ती भूमिका आत्मसात केली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तर पुन्हा पुन्हा पाहावा असे तुम्हाला वाटेल.

ती म्हणतेय की, ‘चवळी कांदा सगळं चिरून ठेवले आणि घरात तपासच नाही आमच्या म्हणून इथे बसले’, हे तिचे वाक्य खूप हसवणारे आहे. लहान मुलांना अभिनय कसा करावा आणि ते करताना काय बोलावे हे आता जास्त सांगावे नाही लागत. तुम्हीही कदाचित माझ्या या विचाराशी सहमत असाल. तिच्याच वयाएवढी किंवा मोठी मुलगी तिथून उठून जाते परंतु ती तिला ‘ये पोरे बस ना इथं’ अस मोठ्या बाईसारखं बोलते.

व्हिडिओत ती सांगतेय की, तिला मुलगी पण आहे आणि झोपळा केलाय म्हणून ती शांत आहे. ‘इतका वैताग आलाय इतका मजी इतका वैताग आलाय’ असे म्हणतात तर खूप छान अभिनय ती करतेय. तीचा जेव्हा पदर पडतो तेव्हा तर ती अगदी देशमुख घराण्याची असल्याचे सांगते आणि आमच्यात पदर लागतोच. जेव्हा ती बाई म्हणते, ‘त्यांना माहितेय का तुमचे आतले हे गुण’ तेव्हा अगदी महिला गप्पा मारताना जसं एकमेकींना मारतात अगदी तसं ती मारत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहताना मजा आली का आणि तिचा कोणता डायलॉग तुम्हाला जास्त आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *