इंदुरीकर महाराज म्हणले की, जनतेला त्यांचे कीर्तन आणि त्यांच्या ओठांवर हसू येत. हे एक असे कीर्तनकार आहेत जे त्यांच्या किर्तनातुन बऱ्याच खऱ्या आयुष्यात चाललेल्या घटनांचा विनोद बनवतात. अशा विनोदांमुळे ते काही वेळेस अडचणीत सुद्धा आले आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये इंदुरीकरांचे कीर्तन असते.
जर माणूस निवांत बसला, काम करत असेल, टेन्शन असेल किंवा सकाळी फिरायला जाताना सुद्धा त्यांचे कीर्तन ऐकतो. वारकरी संप्रदायाचे हे खुपच प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. यांच्या बऱ्याच कीर्तनाचे अनेक व्हिडिओ सुद्धा युट्युबवर प्रसिद्ध झाले आहेत. यांच्यावरच आधारित एका कॉलेजच्या वार्षिक गॅदरिंगमध्ये डान्स बसण्यात आला होता.
हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही खूप हसायला येईल. हा मुलगा इंदुरीकर महाराजांची नक्कल करत आहे आणि त्याच्याबरोबर त्याला साथ द्यायला त्याची मित्रमंडळी सुद्धा आहेत. या व्हिडिओतील इंदुरीकर महाराजांची एन्ट्री ही ‘जय जय राम कृष्ण हरी’ या भजनाने होते. या गाण्यात इंदुरीकर महाराजांचे काही प्रसिद्ध झालेले बोल आहेत.
हा डान्स राजगड इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे येथील कॉलेजच्या मुलांनी सादर केला आहे. यांचा हा डान्स खूपच व्हायरल होत आहे. तुम्हालाही त्यांचा हा इंदुरीकर महाराजांवर आधारित कॉमेडी ग्रुप डान्स कसा वाटला, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करायला देखील विसरू नका कारण आता सगळं बंद असल्यामुळे लोकांना हे मनोरंजन नक्की आवडेल.
पहा व्हिडीओ: