या मराठमोळ्या मुलीने कष्टाने करून दाखवलं, आज चालवते विमान

कलाकार

पुरुष हे वैमानिक असलेले तुम्हीच बऱ्याचवेळा पाहिले आहे परंतु भारतातील एक मुलगी किंवा महिला एक वैमानिक आहे आणि तीही एक मराठी मुलगी हे मला नाही वाटत तुम्ही कधी पाहिले असेल. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या मुलीने वैमानिक होण्यासाठी खूप कष्ट घेतले त्यामुळे आज ती एक पायलट म्हणजेच वैमानिक आहे.

तिने दिवसरात्र मेहनत केल्याने आज ती दुसऱ्या मुलींसाठी एक उदाहरण बनली आहे. आपण ज्या मुलीबद्दल बोलत आहोत ती एक मराठी मुलगी आहे आणि तिचे नाव धनश्री भोसले आहे. धनश्री ही मूळची नाशिकची आहे. परंतु वडिलांची बदली झाल्याने ते नंतर नागपूरला राहायला गेले. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण नागपूरमधून झाले आहे.

तिला लहानपणापासून वैमानिकाचा ड्रेस घालायला खूप आवडत असे आणि मोठी झाल्यावरही तिला वैमानिकच बनायचे होते. तिने तिच्या या स्वप्नाबद्दल तिच्या आईवडिलांना सांगितले होते. घरातील परिस्थिती नसताना देखील वडिलांनी तिला वैमानिकाचे शिक्षण घेऊया म्हणून संधी दिली आणि तिने या संधीचे सोने सुद्धा केले. वडिलांनी धनश्रीच्या शिक्षणासाठी मागचा पुढचा विचार न करता घर विकले आणि तिला पायलटच्या शिक्षणासाठी परदेशात पाठवले.

परंतु तिला शिक्षण घेताना पैसे कमी पडू लागले. अमेरिकेत असताना तिला पैशांची कमतरता असल्याने घरसुद्धा राहायला नव्हते आणि यामुळे तिला बऱ्याच अडचणी आल्या. ती घर नसल्याने गाडीत झोपत असे. पैसे नसल्याने धनश्री दिवसातून फक्त एकवेळ जेवण करायची. तिच्या कॉलेजमध्ये ती एकटीच मुलगी होती.

तिच्या राहणीमानावरून सुद्धा मुलांनी तिला खूप चिडवले आहे. एका क्षणी तिला असे वाटले होते की, हे सर्व सोडून भारतात परत यावे परंतु अनेक विचार मनात आले आणि पुन्हा एकदा ती नव्याने उभी राहिली. सर्व संकटांवर मात करून शेवटी ती एक यशस्वी पायलट बनली आणि ती सध्या एअर इंडिया मध्ये नोकरीला आहे.

गेली ४ वर्षे झाले ती एअर इंडियामध्ये एक पायलट म्हणून कार्यरत आहे. खरंच तिच्या आईवडिलांसाठी ही गर्वाची गोष्ट तर आहेच परंतु एक मराठी मुलगी पायलट आहे हे ऐकून आपल्याला सुद्धा अभिमान वाटतो. धनश्रीला आपल्याकडून पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देऊयात. तुमचेही धनश्री भोसले बद्दलचे काय मत आहे आम्हाला नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *