या लहान पोराला पाहिजे बायको जोमाने होत आहे व्हिडीओ वायरल

कलाकार

कसे आहात मित्रमंडळी?? मजेत ना?? नेहमीप्रमाणेच आजही अतिशय मजेदार व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला त्या लहान मुलाचे विचार ऐकून कौतुकही वाटेल आणि अगदी खळखळून हसू देखील येईल. लहान मुलांना अजून जगाची काही ओळख नसते परंतु ते एवढे हुशार असतात की कोण त्यांना काय देऊ शकत? कोण लाड पुरवेल? आणि कोण शिक्षा करेल? चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा.

या व्हिडिओत जर पाहाल तर एक छोटा मुलगा आहे आणि तो खूप रडताना दिसत आहे. हा छोटासा मुलगा ज्याला अजून नीट खायचे कसे किंवा कसे बोलायचे हेही माहीत नाही आणि तो म्हणतोय की, मला आत्ता बायको आणायची आहे. हाहा!! आहे ना मजेशीर… तुम्ही जर पाहिले असेल तर हा मुलगा खोटं खोटं सुद्धा रडत नाहीये.

अगदी हुंदके देऊ देऊ रडत आहे आणि त्याच्या डोळ्यातून पाणी टपकत आहे. त्याला रडावे की बोलावे हे समजत नाहीये. त्याचे असे म्हणणे आहे की, त्याला घरातील कोणी सुद्धा जेवण देत नाही आणि स्वतःसाठी त्याला बायको आणायची आहे जेणेकरून त्याची बायको त्याला जेवण बनवून पोटभर जेवायला देईल.

बायको आणल्यावर ती काय करेल असे विचारल्यानंतर तो लगे उत्तर देतो की ती जेवायला देईल. त्याला उद्यापरवा आणायची का बायको म्हणल्यावर म्हणतो उद्या परवा नको आजच आणायची आहे. या छोट्याशा मुलाला छोटी बायको नको आहे कारण ती यासाठी जेवण नाही बनवू शकणार. एवढे हुंदके देत रडत असतानाही तो चलाखीने उत्तर देत म्हणत आहे की,

मला मोठी बायको पाहिजे नारळाच्या झाडाएव्हढी कारण छोट्या बायकोला स्वयंपाक बनवायला येणार नाही. खरंच, लहान मुलं अगदी निरागस असतात त्यांना आपण काय बोलतो हेही समजत नसते परंतु याच बोबड्या बोलाने मोठ्या माणसांची करमणूक होते आणि घरात खेळीमेळीचे वातावरण राहते. तुमच्याही आजूबाजूला असे किस्से घडत असतात का? कमेंटद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *