प्रोफेशनल डान्सर्स हे नेहमीच खूप चांगले नाचतात. त्यांच्या डान्स मध्ये त्या डान्स प्रकारानुसार सर्व टेक्निक्स वापरले जातात आणि डान्स केला जातो. हे तर प्रत्येकाला आपल्या आवडीच्या डान्स प्रकारानुसार आवडत असतेच परंतु आपल्याकडे असेही डान्स प्रकार आहेत जे तुम्ही कधीही पाहा नेहमीच ते मनाला खुश करणारे असतात.
असाच एक व्हिडिओ तुमच्या करमणुकीसाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमच्या मनाची मरगळही जाईल आणि ९०च्या दशकाची आठवण सुद्धा येईल ज्यावेळी अनेक गाणी मनात घर करून जात होती. या व्हिडिओमध्ये एक काका डान्स करत आहेत ज्यांचे वय जवळपास ५०च्या सुद्धा वर आहे परंतु त्यांचा डान्स हा पाहणाऱ्यांचे मन जिंकून घेतोय.
संजीव श्रीवास्तव असे या काकांचे नाव आहे. एका कार्यक्रमात हे काका डान्स करत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी सुद्धा स्टेजवर साथ द्यायला उभा आहे. काका हे अगदी मनापासून डान्स करत आहेत. कदाचित हे काकांच्या आवडीच्या गाण्यांपैकी एक असावे. हाहा!! ज्या गाण्यावर हे डान्स करत आहे त्याचे बोल आहेत ‘आप के आ जाने से’.
काकांचा तो डान्स आणि ते चेहऱ्यावरचे हावभाव खरंच तरुण पिढीला तर प्रेरित करतीलच बरोबरच ज्याला डान्स येत नाही ते सुद्धा हे पाहून करायला उत्सुक होतील. एखाद्या तरुण डान्सरला सुद्धा हे काका मागे टाकतील. कआकांची स्वतःची एक स्टायल आहे जी सगळयांचे मन मोहून घेत आहे. त्यांच्या मनापासून हा डान्स येत आहे आणि करताना तेवढीच मजाही ते घेत आहेत.
गाण्याच्या तालावर ते त्यांचा डान्स हळू आणि फास्ट करत आहेत. एवढेच नाही तर ज्यावेळी फिमेल बोल चालू होतात त्यावेळी काका अगदी मुलीचा अभिनय करत आहेत. खरंच, हा व्हिडिओ नक्की पहा आणि असेच हसत राहा. नेहमीप्रमाणे या नवीन व्हिडिओसाठी तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
पहा व्हिडीओ: