स्वतःच्याच लग्नात नवरीने केला मनमोकळा डान्स

कलाकार

लग्नसोहळा किंवा कोणताही कार्यक्रम असला की, आपण त्या कार्यक्रमात काय वेगळे करू शकतो याचा सर्वांना विचार पडतो. आधी लग्नात फक्त हळदी आणि अक्षदा पडायच्या आणि लग्न संपन्न व्हायचे पण आता लग्नात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांची बरीच करमणूक होते आणि ते कार्यक्रमाचा आनंद घेतात.

काही लग्नात नवरा आणि नवरी दोघेही एकमेकांसाठी डान्स करतात तर काहीजण बाहेरून डान्स करणारे बोलवतात. पण एवढे होत असतानाही लग्नात नवरा आणि नवरी किती मजा घेतात हेही महत्वाचे आहेत कारण शेवटी या लग्नसोहळ्याचे उत्सवमूर्ती हे तेच आहेत. आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तिथे जावे आणि ते दृश्य पाहावे आणि जाऊन आपणही मजा घ्यावी असे वाटेल.

या व्हिडिओत तुम्ही पाहाल तर अनेकजण बँडच्या तालावर नाचत आहेत. यामध्ये नवरीसुद्धा पूर्ण मजा घेत आहे. नवरीसुद्धा त्या सर्वांबरोबर डान्स करत आहे. ती दिसायलाही खूप सुंदर आहे आणि त्याप्रमाणेच तिचा डान्स सुद्धा सुंदर आहे. तिच्या लग्नाचा ती पुरेपूर आनंद घेत आहे. तसेच या ठिकाणी बँडवाल्यांची सुद्धा करणमूक होत आहे.

हे बँड पथक खूपच चांगले आहे कारण जर तुम्ही हे कसे वाजवतात ते पाहिले तर बघतच राहावे असे वाटेल. ते वाजवण्यामध्ये अत्यंत कुशल आहेत. काहीजण येऊन त्यांच्या वाजवण्याची कला आवडल्यामुळे त्यांना पैसेसुद्धा देत आहेत. व्हिडिओ बघणाऱ्याला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा अस वाटेल. तुमचीही याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा.

पहा व्हिडिओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *