आजच्या काळात लग्न करणे ही खूप साधारण गोष्ट झाली आहे. लग्न झालेल्या जोडीदाराबरोबर पटत नसले की लगे घटस्फोट आणि दुसरे लग्न केले जाते. कोणीही कोणासाठी थांबत नाही. शेवटी प्रत्येकाला वाटते की आपल्या आयुष्याचा जोडीदार हा त्याला किंवा तिला समजून घेणारा असावा. आज तुमच्यासाठी अशा काही कलाकारांची नावे घेऊन आलो आहोत ज्यांनी दोन लग्न केली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्या कलाकारांची नावे.
१) गिरीश ओक: गिरीश ओक यांना खूपजण ओळखतात. त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. नुकत्याच बंद झालेल्या ‘आगबाई सुनबाई’ या मालिकेत तुम्ही त्यांना पाहिले असेल. गिरीश यांनी पद्मश्री पाठक यांच्याबरोबर पहिले लग्न केले होते. तर दुसऱ्या पत्नीचे नाव पल्लवी ओक आहे. यांना एक मुलगीही आहे.
२) अभिज्ञा भावे: स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमधील तनुजाला तुम्ही अजून विसरला नसाल. तनुजाचे खरे नाव अभिज्ञा भावे आहे. कार्तिकची जवळची मैत्रीण म्हणजे तनुजा. खऱ्या आयुष्यात या तनुजाचे म्हणजेच अभिज्ञाची दोन लग्ने झाली आहेत. तिच्या पहिल्या नवऱ्याचे नाव वरूण वैतिकर आहे तर दुसऱ्याचे मेहुल पै हे आहे.
३) शशांक केतकर: ‘पाहिले ना मी तुला’ यामध्ये आपण शशांकला पाहिले आहे. शशांकने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव तेजश्री प्रधान आहे जी खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रियांका धवले हे त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे.
४) रुपाली भोसले: लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ यामधील संजना हे पात्र घराघरांत पोहचले आहे. संजनाचे खरे नाव रुपाली भोसले आहे. मिलींद शिंदे हे तिच्या पहिल्या पतीचे नाव आहे तर अंकित मगरे हे तिच्या दुसऱ्या पतीचे नाव आहे.
५) स्वप्नील जोशी: सर्वांच्या खूपच परिचयाचे असे हे नाव आहे. स्वप्नीलने आजपर्यंत खूप चित्रपट, मालिका तसेच कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. स्वप्नीलचीही दोन लग्ने झाली आहेत. अपर्णा जोशी असे त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव लीना आराध्ये आहे. त्यांना आता मुलेही आहेत.