आयुष्यात हसणे खूप महत्वाचे आहे. हसल्याने आयुष्य वाढते असे तुम्ही बऱ्याच जणांना म्हणताना किंवा सांगताना ऐकले असेलच. हसल्याने आपली सगळी मरगळ नाहीशी होते आणि नव्याने आपण आपल्या कामाला सुरुवात करतो. सोशल मीडियावर आजकाल अनेक कॉमेडी व्हिडिओ पोस्ट होत असतात तसेच टीव्हीवर सुद्धा तुम्हाला अनेक कॉमेडी रिऍलिटी शो पाहायला मिळतात.
अश्या शोमध्ये कृत्रिम कॉमेडी असते परंतु जेव्हा आपण प्रत्यक्षात कॉमेडी झालेली बघतो तेव्हा त्याची मजा काही वेगळीच असते. तो क्षण आपल्याला पुन्हा आठवला की पुन्हा पुन्हा हसू येते. तुमच्याही आयुष्यातले असे काही क्षण असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आज तुमच्यासाठी असाच एक रिअल कॉमेडी व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल.
हा एका दारुड्या म्हाताऱ्या माणसाचा व्हिडिओ आहे. त्याने देशी दारूची बॉटल हातात घेऊन एक गाणे म्हणले आहे. देशी विदेशी दारू, चकणा, सोडा या सर्व शब्दांचा उपयोग केला आहे आणि थोडेसे बोलून झाल्यावर तो पाणी टाकून घ्या आणि ओम स्वाहा असे म्हणून बॉटल मधली दारू पितो. हाहा!! खूप मजेशीर आहे हे. त्याने प्रसिद्ध चित्रपट ‘शोले’ मधील गब्बरचा सुद्धा एक डायलॉग म्हणला आहे तो ऐकून तर तुम्ही खूप हसाल. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा.
पहा व्हिडीओ: