मराठी माणसाला आपण मराठी आहे याचा गर्व हा नेहमीच असतो आणि नेहमी असणारच, हो ना?? तुम्ही आजवर अनेक असे विडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील जे पाहून तुम्हालाही आपण मराठी आहोत याचा गर्व वाटला असेल. कोणी परदेशात जाऊन आपली संस्कृती तिथे रुजवतो तर कोणी ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवून आपली मान उंचावतो.
यामध्ये जर खासकरून महिलांचा समावेश असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी अजूनच अभिमानाची ठरते. कारण महिला या आधी कोणत्याही क्षेत्रात काम करत नव्हत्या त्यांची हिम्मत होत नसे. पण आता काळ खूप बदलला आणि अनेक महिला या त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी बाहेर पडल्या आहेत. आज असाच एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
तुम्ही लहानपणी अनेक कार्टून पाहिले असतील आणि त्यांचे आवाजही तुमच्या लक्षात असतील. या व्हिडिओमध्ये त्यामधलेच काही आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि आवाज काढणारी व्यक्ती ही एक महिला आहे जीचे नाव मेघना सुधीर एरंडे आहे. मेघना यांनी या व्हिडिओमध्ये अनेक कार्टूनचे आवाज काढून दाखवले आहेत. मेघना या एक अभिनेत्री सुद्धा आहेत तसेच एक व्हॉइस अभिनेत्री सुद्धा आहेत ज्या अनेक कार्टूनचे आवाज काढू शकतात.
नॉडी, बॉब द बिल्डर मधील डिझी, निन्जा हातोडी, आपल्या सगळ्यांचे आवडते डोरेमन, सिनचॅन यांचे आवाज काढून त्यांनी दाखवले आहेत. पुणे स्टेशनवर सुद्धा जी रेल्वेसाठी घोषणा केली जाते त्यालाही मेघना यांचा आवाज आहे. आहे ना हा मजेशीर व्हिडिओ. अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर नक्की करा.
पहा व्हिडीओ: