प्रत्येकाची आवड ही वेगळी असते आणि बरेचजण त्याची जोपासना सुद्धा करतात. आवडीच्या पुढे वयाची काही किंमत नाही. आपल्याला जे पाहिजे ते करण्यात खूप आनंद मिळतो आणि त्यातूनच जगण्याची इच्छा आणि उत्साह सुद्धा मिळतो. आज असाच एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे मन खूप प्रसन्न होईल.
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गाण्यावरील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत तुम्हाला आजीबाई नाचताना दिसतील. त्या एवढ्या सुंदर नाचत आहेत की तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा असे वाटेल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे बघण्यासारखे आहेत. एवढे वय झाले असूनही त्या तरुणाईला मागे टाकत असं नाचत आहेत.
कोणाला वाटणारही नाही की त्यांचे वय ६२ वर्षे आहे. त्यांचा डान्स अगदी उत्साहित आणि मन प्रसन्न करण्यासारखा आहे. दिसायलाही आजीबाई खूप सुंदर दिसत आहे. मेकअपही छान केला आहे. थोडक्यात या व्हिडिओमध्ये त्यांचे सादरीकरण खूप चांगले आहे. वयाची गोष्ट लक्षात न घेता त्यांनी हा डान्स केला आणि स्वतःची आवड जगासमोर आणली. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून कसे वाटले? सांगायला विसरू नका.
पहा व्हिडीओ: