कधी कोणावर काय वेळ येईल हे कोणीही सांगू शकत नाही. आज अशी एक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी ऐकून तुम्हालाही वाईट वाटेल आणि तुम्हालाही विचार करण्यास भाग पडेल की आपल्या समाजात नक्की काय चालू आहे? अशा घटना वारंवार का घडत आहेत? काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
त्यात त्यांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या एका दिग्दर्शकाबद्दल सांगितले आहे. त्यांचे नाव आहे राजीव सापटे. हे दिग्दर्शक एवढे बुद्धिमान होते आणि त्यांकडे एवढ्या कला होत्या तरीही त्यांनी आत्महत्या केली. एवढे चांगले लोक जर आत्महत्या करायला लागले तर आपले भविष्य धोक्यात आहे. राजीव हे खूप चांगल्या स्वभावाचे होते.
त्यांकडे जवळपास ३० च्या वर कामगार काम करत होते. मालिकेचा सेट अगदी ३-४ दिवसांत त्यांनी उभा केला होता. कोरोनामुळे ज्यावेळी महाराष्ट्रातील शूटिंग ही राज्याबाहेर हलवण्यात आली त्यावेळी सुद्धा अगदी कमी वेळेत आणि कमी सामानात सेट उभारला होता. राजीव यांनी कधीच कोणत्या कामगाराचा पगार अडवला नाही. सर्वांबरोबर चांगले असायचे. त्यांच्याकडे सध्या जवळपास पाच प्रोजेक्टस होते.
एवढे काम असूनही राजीव यांनी असे का केले? याचा निवेदिता आणि सर्वानाच प्रश्न पडला आहे. असे म्हणले जाते की त्यांनी युनियनला कंटाळून आत्महत्या केली. परंतु नक्की कारण अजूनही समोर नाही आले. निवेदिता यांनी त्या व्हिडिओत अगदी मुख्यमंत्री तसेच राज ठाकरे आणि संबंधित व्यक्तींना राजीव यांना न्याय मिळावा यासाठी कळकळीची विनंती केली आहे. तुमच्याही या बाबत काय प्रतिक्रिया आहेत त्या आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.
पहा व्हिडीओ: