मित्रांनो नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामुळे तुमची करमणूक होईल. रिकाम्यावेळी बसलो की प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल असतो मग मोबाईल वर इकडे तिकडे करताना आपण आपल्या मनाची दिवसभराची मरगळ जाईल असे काहीतरी बघायला शोधत असतो. हा जो व्हिडिओ आहे तो पाहून तुमची ही दिवस भराची मरगळ नाहीशी होणार आहे.
या व्हिडिओतील चिमुकलीला नाचताना पाहून तुमचे मन अगदी प्रसन्न होईल. मायलेकिंचा हा डान्स खूपच वायरल होत आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील प्रसिध्द डान्स प्रकार म्हणजेच लावणी सादर केली आहे. या छोट्या मुलीची आई आणि मुलगी दोघीही सारख्या स्टेप्स वरती नाचत आहेत. हि चिमुकली आईने जस शिकवलं आहे त्यानुसार उत्तम नाचत आहे.
तुम्ही जर नीट पाहिले तर तुमच्या लक्ष्यात येईल की, ही चिमुकली सुध्दा आईपेक्षा कमी नाहीये. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप सुंदर आहेत आणि हेच हावभाव बघणाऱ्याचे मन मोहून घेत आहेत. एवढ्या लहान वयातही तिला कोणत्या वेळी काय हावभाव द्यायचे आणि कोणती स्टेप कधी करायची हे लक्ष्यात राहते म्हणजे नवलच आहे. तुम्हालाही हा मायलेकिंचा लावणी डान्स कसा वाटला? कमेंट मध्ये नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: