मुलींची रोडवर केलेली लावणी तुम्हाला नक्की आवडेल

कलाकार

जवळपास सर्वांच्या आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या गोष्टींपैकी शाळा किंवा कॉलेज यांच्या आठवणी जास्त असतात. या वेळी आपण आपल्याला पाहिजे तसे वागत असतो. अनेक कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात आणि विविध योजना राबविल्या जातात. वार्षिक स्नेहसंमेलनात तर जवळपास अनेक जणांनी सहभाग नक्की घेतला असेल आणि स्टेजवर जाऊन लोकांची करमणूक केली असेल.

आता अनेक कॉलेज असे आहेत जिथली मुलेमुली मिळून रोड शो सुध्दा करतात आणि वाटसरुंचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप छान वाटेल. हा व्हिडिओ आय आय टी मुंबई येथील मुलींचा आहे. या मुलींच्या ग्रुपने एक डान्स सादर केला आहे जो पाहून तुम्हाला आज नवीन काहीतरी पाहिले असे वाटेल.

जे इतर डान्सचे व्हिडिओ तुम्ही बघता त्यापेक्षा यामध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे डान्स सादर केला आहे. तुम्ही पाहू शकता की मुलींनी काष्टा साडी घातली आहे आणि मराठी मेकअप केला आहे. त्या पूर्ण गोलात त्या सगळीकडे फिरून नाचत आहेत जेणेकरून सर्वांना तो डान्स दिसावा. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तुम्हीही नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *