लॉकडाऊन मध्ये अनेक जणांनी घर बसल्या बसल्या अनेक गोष्टी केल्या तर काहींनी अनेक गोष्टी नवीन शिकल्या सुध्दा. अनेकांना घरी बसून कंटाळा आला. काहीतरी नवीन करावे असे प्रत्येकाला वाटू लागले आणि अनेकांनी युट्यूब वर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. जेणेकरून बघणाऱ्याला सुध्दा आनंद मिळतो आणि त्यातून कमाई सुध्दा करू शकतो.
आजवर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील परंतु इथे एक सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये तुम्ही जर पाहिले तर ‘तू ही रे‘ या मराठी चित्रपटातील गुलाबाची कळी यावर डान्स केला आहे. इतर व्हिडिओपेक्षा वेगळे काहीतरी या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता.
यामध्ये व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग खूप छान केले आहे आणि त्याप्रमाणेच डान्स सुध्दा सुंदर आहे. मराठी गाण्यावर बॉलिवूड डान्स केला आहे. हा डान्स शिवानी नाईक, नमिता मोहिते आणि असावरी जोशी यांनी केला आहे. चेहऱ्यावर ही साजेसे असे भाव देऊन खूप छान असा डान्स या तिघींनी केला आहे. तुम्हालाही या तिघींपैकी कोणाचा डान्स जास्त आवडला, आम्हाला नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: