आता आता या अभिनेत्रींचे झाले निधन

कलाकार

मित्रानो पसरलेला आजार कमी झाला असला तरी दुःखाचे डोंगर कोसळत आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण भारतभर शोककळा पसरली होती. अनेक वाद देखील होऊ लागले होते. त्यांचं दुःख सावरत असताना बप्पी लहरी सारखे गोल्डन मॅन गायक देखील जग सोडून गेले. पसरलेल्या आजाराने नाही तर वयाच्या अभावी देखील अनेक लोक जग सोडून जात आहेत.

अनेक तारे जग सोडून जाताना दिसत आहेत. आता मात्र मल्याळम चित्रपट सृष्टी सोबत अनेक लोकांना दुःख झाले आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री केपीएसी ललिता यांचे निधन झाले आहे. ललिता या ७४ वर्ष्यांच्या होत्या. मंगळवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ ला केरळमधील त्यांच्या राहत्या घरी रात्रीच्या वेळी त्यांनी जगाला निरोप दिला.

मल्याळम चित्रपट सृष्टीतील गाजलेले दिगदर्शक भरथन यांच्या पत्नी ललिता होत्या. ललिताच्या कुटुंबात त्यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव सिद्धार्थ भरथन तर मुलगी श्रीकुट्टी. ललिता यांचा मुलगा भरतन हा देखील मल्याळम अभिनेता आणि दिगदर्शक आहे. ललिता यांच्या आ’त्म्या’स शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मल्याळम चित्रपट सृष्टी देखील शोक व्यक्त करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *