नवीन वहिनी साहेबांना पाहून नंदिता म्हणाली

कलाकार

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता चालू होऊन चार वर्षे झाली आहेत. या एवढ्या मोठ्या कालावधीत या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राणादा आणि अंजली आता घराघरांत अगदी रुळले आहेत असं म्हणलं तर वावग नाही. तुम्हालाही या मालिकेबद्दल काय वाटते कंमेन्ट मध्ये नक्की सांगा? या मालिकेमध्ये गेल्या आठवड्यातल्या भागात तुम्हाला एक ट्विस्ट पाहायला मिळाला असेल.

नंदिता ही भूमिका तुमच्या ओळखीची असेलच. नंदिता ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव धनश्री कडगावकर आहे. नंदिता ही आता सध्या चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. नेहमी नवनवीन फोटो ती तिच्या इन्स्टाग्रामवर टाकत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तिने सांगितले आहे की ती लवकरच आई होणार आहे.

तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी खूप लाईक्स आणि आशीर्वाद दिले आहेत. धनश्रीने डिसेंबर २०१३ मध्ये ध्रुवेश देशमुख बरोबर लग्न बंधनात अडकली. धनश्रीचे माहेर आणि सासर पुण्यातच आहे. तिने ‘माझिया प्रियाला प्रित कळेना, गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ, तुझ्यात जीव रंगला’ अशा अनेक मालिकेमध्ये काम केले आहे.

तिने या मालिकेत बरीच वर्षे काम केले परंतु आता तिला या मालिकेपेक्षाही तिच्या आयुष्यात महत्वाचे असे क्षण आहेत ज्यामुळे धनश्रीला तुझ्यात जीव रंगला मध्ये आता काम नाही करता येणार. आता नंदिता ही भूमिका धनश्री ऐवजी अभिनेत्री माधुरी पवार साकारणार आहे. ही बातमी सांगण्यासाठी धनश्रीने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.

ज्यात तिने ही बातमी सांगितली आहे की, आता नंदिताची भूमिका ती नाही करणार कारण तिच्या आयुष्यात यापेक्षाही काही महत्त्वाचे आहे. अभिनेत्री माधुरी पवार आता नंदिताची भूमिका साकारणार आहे. जसे प्रेम दर्शकांनी धनश्रीला दिले तसेच प्रेम दर्शकांनी माधुरीलाही द्यावे अशी विनंती केली आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका दर्शकांनी अशीच पाहत राहावी आणि असेच प्रेम देत रहा अशीही विनंती तिने व्हिडीओमध्ये केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *