‘तेरे नाम’ मधली हिरोईन पहा आता कशी दिसते

कलाकार

प्रसिद्ध बॉलीवूड दबंग खान म्हणजेच सलमान खान हा सगळ्यांच्या ओळखीचा आहे. सलमान खानने बऱ्याच नवीन लोकांना लाँच करायला मदत केली आहे. सलमानने बऱ्याच नव्या कलाकारांना त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे आणि आता ते चांगले प्रसिद्ध कलाकार बनले आहेत. २००३ मध्ये आलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात सलमान खान आणि भूमिका चावला यांनी अभिनय केला.

या चित्रपटात देखील सलमानने दक्षिण भारताची अभिनेत्री भूमिका चावलाला बॉलीवूड मध्ये लाँच केले होते. बॉलीवूडमध्ये भूमिकाचा तो पहिलाच चित्रपट होता आणि दर्शकांनी या चेहऱ्याला पहिल्यांदा पाहिले. खूप लोकांना असे वाटले की ही कोणीतरी नवी अभिनेत्री आहे परंतु जेव्हा तिची माहिती पाहिली तेव्हा लक्ष्यात आले की ती तामिळ, तेलुगू मध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आहे.

साऊथ मध्ये ती प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे. चला तर मग जाणून घेऊया भूमिका चावला बद्दल अजून काही गोष्टी…भूमिकाचे खरे नाव रचना आहे. तिचा जन्म २१ ऑगस्ट १९७८ ला नवी दिल्लीच्या एका पंजाबी घरात झाला. भूमिकाने तिचे शिक्षण नवी दिल्लीमधून पूर्ण केले. तिचे वडील एक आर्मी ऑफिसर आहेत आणि तिला एक मोठा भाऊ आणि लहान बहीण आहे.

चित्रपटात काम करण्याआधी भूमिका योगा शिकत होती आणि तिला योगा शिक्षकावरच प्रेम झाले. त्यांनी एकमेकांना चार वर्षे डेट केले आणि २१ ऑक्टोबर २००७ मध्ये योगा शिक्षक भरत टाकूर बरोबर नाशिकच्या गुरुद्वारामध्ये लग्न केले. १९९७ ला स्वतःचे करिअर घडवण्यासाठी भूमिका मुंबईमध्ये आली. विज्ञान आणि व्हिडीओ अल्बममध्ये काम केले. झी टीव्हीच्या ‘हिप हिप हुर्रे’ या शोमध्ये सुद्धा भूमिका दिसली होती.

भूमिकाने पहिला तेलुगू चित्रपट ‘येवाकुडू’ पासून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर तिने बरेच चित्रपट केले आणि एक यशस्वी अभिनेत्री बनली. नंतर तिला २००३ मध्ये सलमान खानबरोबर ‘तेरे नाम’ या चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने एका सज्जन मुलीची भूमिका साकारली होती जी नंतर खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटानंतर भूमिकाने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली होती.

२००१ मध्ये आलेल्या ‘कुशी’ या चित्रपटाला फिल्म फेअर बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला होता. २००४ मध्ये अभिषेक बच्चनबरोबर रन या चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘सिलसिले’ आणि ‘दिल जो भी कहे’ मध्ये सलमान बरोबर काम केले परंतु हे दोन्ही चित्रपट फ्लॉप गेले. २००७ मध्ये गांधी, माय फादर, एमएस धोनी: द अनटोल्ड लव स्टोरी मध्ये सुशांत सिंह राजपूत बरोबर काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *