फुलाला सुगंध मातीचा मधील भोळी कीर्ती पहा किती हॉट आहे

कलाकार

स्टार प्रवाहवर बऱ्याच नवीन मालिका चालू झाल्या आहेत त्यातलीच एक म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. ही मालिका एका कमी शिकलेल्या घराण्याची आहे जिथे आयपीएस बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या मुलीचे लग्न होते. त्या मुलीच्या स्वप्नाचे नंतर काय होते हे तुम्हाला मालिका बघूनच समजेल. आज आपण इथे त्याच सुशिक्षित मुलीबद्दल माहिती घेणार आहोत जिचे मालिकेमधले नाव कीर्ती हे आहे.

चला तर मग जाणून घेऊया ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेत असणाऱ्या कीर्तीच्या खऱ्या आयुष्याबद्दल थोडी माहिती. या मालिकेतील कीर्तीची प्रमुख भूमिका अभिनेत्री समृध्दी केळकर हिने साकारली आहे. तिच्याबरोबर प्रमुख भूमिकेत असणाऱ्या शुभमचे खरे नाव हर्षद अतकरी आहे. समृद्धीचा जन्म २३ डिसेंबरमध्ये ठाणे येथे झाला.

तिच्या वडीलांचे नाव सुनील केळकर तर आईचे नाव मेधा केळकर आहे. तिला एक लहान बहिणसुद्धा आहे. तिने तिचे शालेय शिक्षण सरस्वती सेकंडरी हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने बीकॉमची पदवी मिळवली. समृद्धीला लहानपणापासून नृत्याची खूप आवड आहे. तिने कथ्थक या नृत्य प्रकारात विशारद ही पदवी मिळवली आहे.

ती नुपूर डान्स अकॅडमीमधून कथ्थक शिकली आहे. कथ्थकसोबतच हिप हॉप, वेस्टर्न, बॉलीवूड, लावणी हे नृत्य प्रकार शिकली आहे. कथ्थकमुळे तिला अभिनय करायची इच्छा झाली त्यामुळे तिने बऱ्याच ऑडिशन्सही दिल्या. बऱ्याच ऑडिशन्सनंतर तिला कलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमासाठी निवडले गेले.

या स्पर्धेत ती रनरअप विजेती ठरली. त्यानंतर कलर्स मराठीवरीलच ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत तिला पहिल्यांदाच प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने लक्ष्मीची भूमिका साकारून या टेलिव्हिजन क्षेत्रांत जोरदार पदार्पण केले. तिच्यासोबत ओम प्रकाश शिंदे आणि सुरभी हांडे हे प्रमुख भूमिकेत होते.

त्याआधी तिने स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत ओवी ही भूमिका साकारली होती. ‘दोन कटिंग’ या मराठी शॉर्टफिल्म मध्ये तिने काम केले. ‘नाखवा’ हा तिचा गाण्याचा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाला होता. सध्या ती ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत किर्तीची भूमिका करत आहे. ही होती समृद्धी केळकर बद्दल थोडक्यात माहिती.

1 thought on “फुलाला सुगंध मातीचा मधील भोळी कीर्ती पहा किती हॉट आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *