या हिरोईनच्या मागे इतका वेडा होता तुषार कपूर, सर्वांसमोर म्हणला लग्न करेल तर फक्त

कलाकार

९० च्या दशकात प्रसिद्ध असलेले अभिनेते जितेंद्र कपूर यांचा मुलगा म्हणजेच तुषार कपूर आता ४४ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९७६ ला झाला. जितेंद्र जेवढे त्यांच्या कारकिर्दीत प्रसिद्ध झाले होते तेवढे तुषार नाही झाले. तुषारने खूप चित्रपटात काम केले परंतु तुषार एवढे हिट गेले नाही. तुषारने त्याच्या सिनेसृष्टीतील अभिनयाची सुरुवात २००१ मध्ये ‘मुझे कुछ कहना है’ यापासून केली.

या चित्रपटात करीना कपूर सुद्धा होती. तुषारला या चित्रपटासाठी बेस्ट मेल डेब्यू एक्टरचा पुरस्कार मिळाला. नंतर तुषार कपूरने ‘क्या दिल ने कहा’, ‘ये दिल’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’ आणि ‘कुछ तो है’ यांसारख्या चित्रपटात काम केले परंतु हे सर्व चित्रपट फ्लॉप गेले आणि तुषार कपूरला नंतर काम मिळेना झाले. जवळपास सर्व चित्रपटात तुषारने प्रेमीची भूमिका साकारली होती आणि त्यामुळेच त्याला करीना कपूरवर प्रेमसुद्धा झाले.

आज आपण इथे तुषार कपूरच्या एकतर्फी प्रेमाबद्दल बोलणार आहोत. तुषार हा करिनावर प्रेमच करत नव्हता तर त्याला तिच्याबरोबर लग्नसुद्धा करायचे होते. करिनाच्या मनात त्याच्याबद्दल थोडेही प्रेम नव्हते. यामुळे तुषार कपूरची प्रेमकहाणी पुढे जाऊ शकली नाही. ज्यावेळी तुषार कपूर बरोबर करीना कपूर ‘जीना सिर्फ मेरे लिए’ ची शूटिंग करत होती त्यावेळी हृतिक रोशनबरोबर प्रेमप्रकरण चालू होते आणि ते प्रकरण बातम्यांमध्ये सुद्धा खूप गाजले.

एका मुलाखतीत तुषार कपूरला लग्नाबद्दल विचारले होते तेव्हा तो बोलला होता की त्याला करीना सारखी मुलगी पाहिजे. अजूनही तुषार कपूरने लग्न नाही केले परंतु सरोगसीमुळे त्याला एक मुलगाही आहे. मुझे कहना है हा चित्रपट रोमँटिक कॉमेडीवर आधारित होता. तुषारचा हा पहिला चित्रपट होता तर करीना कपूरचा दुसरा होता.

या चित्रपटात तुषार आणि करिनाबरोबरच अमरीष पुरी, रिंकी खन्ना, दलीप ताहिल आणि आलोक नाथ यांसारखे अभिनेते अभिनेत्री काम करत होते. यामुळे चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. तुषारने जेव्हा करीना बरोबर चित्रपट केला तेव्हा करीना खूप सुंदर दिसत होती आणि कोणीही तिच्याकडे लगे आकर्षित होऊ शकत होत. आजही करीना तिच्या दिसण्याच्या बाबतीत खूप काळजी करते आणि ती सुंदरही दिसते.

सुंदर चेहऱ्यावर तुषार कपूरचे मन आले. ती ग्लैमरस आणि फिट आहे. तुषारने आता अभिनय सोडला आहे आणि सध्या तो प्रोड्युसर आहे. तुषार हा नुकत्याच रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटाचा को-प्रोड्युसर आहे. करीना कपूर सध्या आमिर खान बरोबर ‘लाल सिंह चड्डा’ यामध्ये अभिनय करत आहे. या चित्रपटाची शूटिंग संपली आहे आणि त्यांचे चाहते आता त्या चित्रपटाच्या रिलीजची वाट बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *