सहकुटुंब सहपरिवार मधील अवनी पहा

कलाकार

आपण दैनंदिन आयुष्यात करमणूक म्हणून बऱ्याच मालिका बघतो. या मालिकांमध्ये वेगळ्या वेगळ्या स्वभावाची, संस्कृतीची पात्र आपण अभिनय करताना पाहतो. कोणी प्रेमळ स्वभावच असत तर कोणी रागीट तर कोण मनमिळाऊ असतं. असंच एक पात्र आहे, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमधले. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत कुटुंब आणि कुटुंबाची एकत्र असण्याची ताकद दाखवली आहे.

त्या कुटुंबातील व्यक्तींमधला जिव्हाळा-प्रेम हा बऱ्याच प्रसंगांमधून आपल्याला दिसून येतो. या मालिकेमधलं रागीट आणि तितकंच गोड अस पात्र म्हणजे अवनी. तर आपण आज इथे अवनीबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. अवनीचे खरे नाव साक्षी महेश गांधी आहे. साक्षीचा जन्म ९ डिसेंबर १९९६ ला चिपळूण येथे झाला. चिपळूण मधेच तिने शालेय शिक्षण पूर्ण केले.

जिल्हा परिषदेच्या शाळेमधून प्राथमिक शिक्षण घेतले. वक्तृत्वाची आवड असणाऱ्या साक्षीला तिच्या या कलेमुळे बरीच पारितोषिकेही मिळाली आहेत. डिव्हिजि महाविद्यालयातुन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तेव्हापासूनच साक्षीने अभिनयाला सुरुवात केली. ‘खारुताईचा ड्रमाटीक विकेंड’ या एकांकिकेमध्ये तिने काम केले होते. शिक्षण घेत असतानाच तिला एका चित्रपटाची संधी मिळाली.

शिक्षण झाल्यावर ती मुंबईला करिअर घडवण्यासाठी आली. मुंबईमध्ये तिने नोकरी करत करत छोटया मोठ्या भूमिका करायला चालू केले. ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेतही तिने एक छोटी भूमिका केली आहे. त्या मालिकेत तिने एका टुरिस्ट गाईडची भूमिका केली होती. ‘अलटी पलटी सुमडीत कल्टी’ या मालिकेतही तिने काम केले होते.

‘हिरकणी’ या चित्रपटात राज्याभिषेकाच्या वेळी ज्या राण्या होत्या त्यामध्ये साक्षी एक होती. ‘बलोच, मन उधाण वारा’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत अवनीची भूमिका साकारत आहे. अवनी ही कधी प्रेमळ तर कधी रागीट अशा स्वभावाची दाखवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *