आजपर्यंत आपण खूप मालिका पाहिल्या असतील. नवनवीन मालिका येत असतात आणि आपली करमणूक करत असतात. अशीच एक मालिका आहे ‘सहकुटुंब सहपरिवार’ जी स्टार प्रवाहवर प्रसारित होते. ही मालिका लुप्त होत चाललेल्या एकत्रित कुटुंब पद्धतीबद्दल आहे. संपूर्ण परिवार कुटुंबावर ज्या काही अडचणी येतात, त्यांना एकत्रित सर्व मिळून सामना करतात.
यातही तसेच दाखवले आहे. या मालिकेमधली अंजी आणि परश्याची जोडी खूप प्रसिद्ध होत आहे. या दोघांमधली भांडण, प्रेम, रुसवेफुगवे बघायला सर्वांनाच आवडते. आज आपण इथे अंजीच्या खऱ्या आयुष्यातील माहिती घेणार आहोत. या मालिकेत अभिनेत्री कोमल कुंभारने अंजीची भूमिका साकारली आहे. अंजीचे लग्न काही कारणांमुळे पश्याबरोबर अचानकपणे होते.
लग्नानंतर त्यांच्या संसारात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, त्या कोमलने उत्तमरित्या साकारल्या आहेत. ती अंजीची भूमिका अतिशय मन लावून करत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अंजी म्हणजेच कोमलची ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही पहिलीच मालिका आहे. पहिली मालिका असूनही ती अगदी उत्कृष्ट अभिनय करत आहे. तिला अभिनयाबरोबरच गायनाचीही आवड आहे.
कोमलच्या अकाउंटवर टाकलेले तुम्ही गायनाचे व्हिडीओ बघितले असतीलच. ती तिचे गायनाचे बरेच व्हिडिओ पोस्ट करत असते. तिने ‘अड्डा’ या शॉर्टफिल्म मध्ये काम केले आहे. लहान असताना तिने अनेक नाटकात सहभाग घेतला आहे. तीचि ‘वाली’ या नावाची एकांकिका प्रसिद्ध आहे. कोमलला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.