नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांचे मन मोहून घेतो. नाना यांनी बऱ्याच चित्रपटात नायक आणि खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. खूपच कमी लोकांना माहीत असेल की, नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर हे आहे. नाना यांचा जन्म १ जानेवारी १९५१ला झाला.
त्यांना दोन भाऊ सुद्धा आहेत, ज्यांची नावे दिलीप आणि अशोक पाटेकर आहे. नाना यांनी निलकांती पाटेकर बरोबर १९७८ मध्ये लग्न केले. ज्या आधी बँक अधिकारी, अभिनेत्री आणि प्रोड्युसर होत्या. नाना पाटेकर यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीत बरेच हिंदी आणि मराठी चित्रपट केले. त्यांच्या ‘परींदा, क्रांतिवीर, अपहरण, अंगार’ या चित्रपटांसाठी त्यांना नॅशनल पुरस्कार मिळाला आहे.
त्यांचे असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. ‘राजनीती, वेलकम, वेलकम बॅक, नटसम्राट’ असे अनेक सुपरहिट चित्रपट नाना पाटेकर यांनी केले आहेत. तसेच नाना यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा प्रदान केला गेला आहे. अशा या सुपरहिट आणि लोकांच्या मनाला भावणाऱ्या मुलाबद्दल कोणाला माहिती करून घेऊ वाटणार नाही.
चला तर मग पाहूया नाना यांचा मुलगा कोण आहे? काय करतो? त्यांच्या मुलाचे नाव मल्हार पाटेकर आहे. मल्हार दिसायला नाना पाटेकर यांच्यासारखा दिसतो. ‘प्रहार’ या चित्रपटापासून मल्हारने अभिनयाला चालू केले, परंतु मल्हार एवढे प्रसिद्ध नाही झाले. मल्हार हे अभिनेते आणि दिग्दर्शक आहे. सध्या ते बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याच्या कामात आहेत. लवकरच आपण त्यांना चित्रपटात पाहू.