नेहा कंकर ने यामुळे केले घाई घाईत लग्न

कलाकार

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करला कोण नाही ओळखत. सोशल मीडियावर सगळीकडे तिचेच गाणे पसरले आहेत. नेहाने नुकतेच रोहनप्रीत सिंग बरोबर लग्न केले. त्या दोघांचेही लग्नातले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तर खूप लाईक्स दिले आहेत. पण लग्न होऊन १० दिवसच झाले आणि सोशल मीडियावर एक फोटो खूप प्रसिद्ध होत आहे

ज्यात नेहाने मांडीवर एक बाळाला घेतले आहे आणि त्यात रोहनप्रीत सिंग सुद्धा आहे. हा फोटो पाहून सगळ्यांच्या मनात बरेच विचार येत आहेत आणि म्हणत आहेत की, नेहाने इतक्या घाईत लग्न का केले? गायिका नेहा कक्कर आणि गायक रोहनप्रीत या दोघांनी २४ ऑक्टोबर २०२० ला दिल्लीत मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले आणि २६ ऑक्टोबरला चंदिगढमध्ये खूप मोठा स्वागत कार्यक्रम आयोजित केला होता.

नेहा आणि रोहनप्रीत हे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत होते. रोहनप्रीत याने २०१८ ला ‘रायझिंग स्टार २’ मध्ये भाग घेतला होता तसेच सारेगमप मध्येही २००७ मध्ये भाग घेतला होता. दोघेही एकमेकांना पसंत करत असल्याने त्यांनी लगेच लग्नही करून टाकले. रोहनप्रीत हा नेहापेक्षा ६ वर्षांनी लहान आहे. दोघांचेही लग्नातले फोटो आणि व्हिडीओ खूप प्रसिद्ध होत आहेत.

एका फोटोमध्ये नेहाने रोहनप्रीतला प्रपोज केले आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने त्याला किस सुद्धा दिली आहे. पण नेहाच्या मांडीवर त्या फोटोमध्ये कोणाचे मूल आहे माहीत आहे का? दोघांच्या लग्नामधले बरेच फोटो व्हायरल झाले आणि त्यातल्या एका फोटोमध्ये नेहाच्या मांडीवर एक अतिशय गोंडस बाळ आहे. पण सत्य हे आहे की, ते बाळ नेहाचे नसून तिच्या एका परिचयाचे आहे. तिने फक्त त्या बाळाला मांडीवर घेतले होते. नेहाच्या लग्नातल्या मेकअप बद्दल बोललो तर तिने लेहेंगा आणि पोझ या अनुष्का शर्मा आणि प्रियांका यांच्यासारख्या दिसत आहेत. पण नंतर नेहानेच असे ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *