काय असणार आहे नवीन मालिकेत

कलाकार

नवरा कसा हवा? तर ९ ते ५ नोकरी करणारा, साधा सरळ नाकासमोर चालणारा हवा. मनमिळाऊ, नम्र, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा हवा. हा डायलॉग सध्या खूप प्रसिद्ध होत आहे. बरोबर ओळखलात, हा डायलॉग नवीन येणाऱ्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या नवीन मालिकेचा आहे. ‘सांग तू आहेस ना’ या नवीन मालिकेबरोबरच आपल्याला आता स्टार प्रवाहवर ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही अजून एक नवीन मालिका बघायला मिळणार आहे.

ही मालिका २१ डिसेंबर २०२० पासून स्टार प्रवाहवर रात्री १०.३० वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रसारित झाला आहे. या मालिकेत दोन कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. स्वाती आणि रघु हे दोघे या मालिकेत प्रमुख आहेत. प्रोमोमध्ये स्वातीला तिची मैत्रीण विचारते की तुला कसा नवरा हवा?

रघुलाही आपण पाहिले असलेच की तो एका व्यक्तीची कॉलर पकडून त्याला बोलतो की, रघु फक्त एकदाच प्रेमाने सांगतो, नायतर उलटा टांगतो. प्रोमोमध्ये आपण पाहिले की रघु हा एक आजीला जमिनीची कागदपत्रे देतो. प्रोमोवरून समजते की रघु हा एक समाजसेवक आहे. या मालिकेत स्वाती रघुला कशी साथ देते हे आपण मालिका प्रसारित झाल्यावर नक्कीच पाहू. तुम्हीही ही मालिका पाहण्यास उत्सुक आहात का? कमेन्ट मध्ये नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *