‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका दर्शकांचे खूपच मन मोहून घेत आहे. या मालिकेतील कलाकार अतिशय उत्तम अभिनय करत आहेत. त्यांच्या या कष्टामुळेच आज या मालिकेला एवढे पसंत केले आहे. या मालिकेत एक पात्र आहे, जे घरातील सर्व कामे करते. ते पात्र खूप खोडकर आहे आणि चुलबुली आहे. तिचे नाव आहे भिंगरी.
भिंगरी घरातील सुनांबरोबर सर्व कामे करते. याच भिंगरीच्या खऱ्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. भिंगरीचे खरे नाव निकिता पाटील आहे. निकिताने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकमुनिकेशन मध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. ती जळगाव जिल्ह्यात राहते. ती शिक्षण घेत असताना सुद्धा अभिनय करत होती. तिने अनेक नाटकेही केली.
तिला अभिनयाची आवड असल्याने बरेच ऑडिशन्स सुद्धा तिने दिले. लॉकडाऊन असल्याने तिने घरूनच बऱ्याच ऑडिशन्स मध्ये भाग घेतला. अखेर खूप परिश्रमानंतर तिला टीव्हीवर झळकण्याची संधी मिळाली. तिला ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिच्या बहिणीचे नाव परी पाटील आहे. तिचाही युट्युबवर चॅनेल आहे.
परीने आपली बहीण अभिनेत्री झाली म्हणून एक व्हिडिओ सुद्धा बनवून तिच्या चॅनेलवर पोस्ट केला आहे. जेव्हा निकिता घरी आली त्यावेळी तिचे अगदी ढोलताशांच्या आवाजात जंगी स्वागत झाले. तिच्या गावातील निकिता पहिली मुलगी आहे, जिला अभिनय क्षेत्रात अशी संधी मिळाली आहे. निकिताला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.