प्रसिद्ध अभिनेता असला की, सगळ्यांना त्याची मुले मुली पाहण्याची तसेच ते कसे दिसतात कसे राहतात हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. अनिल कपूर हे एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांची मुलगी सोनम कपूर ही सुद्धा बऱ्याच जणांना माहीत आहे पण खूपच कमी लोकांना सोनम कपूरच्या बहिणीबद्दल माहिती असेल. इथे आपण त्याच बहिणीबद्दल माहिती घेणार आहोत.
अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या मोठ्या मुलीचे नाव रिया कपूर आहे. रिया ही सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूर पेक्षा मोठी आहे. तिचा ज्यावेळी वाढदिवस होता तेव्हा सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बहिणीचा फोटो टाकला होता आणि लिहिले होते की जन्मदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही सर्वात जास्त प्रिय आहात.
तिचा वाढदिवस ५ मार्चला १९८७ ला झाला आणि या २०२० यावर्षी तिचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि सोनम कपूर हे जसे नेहमी लाइमलाईट मध्ये राहतात तसे रिया कपूर नाही राहत, ती नेहमी कॅमेरापासून दूर असते. रिया ही एक स्टायलिस्ट आहे. ‘आयशा आणि प्लेअर’ या चित्रपटात तिने आपल्या बहीण आणि वडिलांना स्टायलिश लुक दिला आहे.
अनिल कपूरच्या दोन्ही मुली एक असा ब्रँड आणण्याचा योजना करत आहेत ज्याचे कपडे सर्वजणांना वापरता आले पाहिजे. ‘रांझना, भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांच्या यशानंतर सोनमने बहिणीबरोबर या प्रोजेक्टवर काम करायचे ठरवले होते. सोनम आज बॉलीवूडमध्ये तिच्या अनोख्या स्टाईलमुळे ओळखली जाते. ती आजची सर्वात स्लाइलिश अभिनेत्रींपैकी एक आहे, जे तिच्या ‘आइशा’ चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळते.
पण हे खूपच कमी लोकांना माहिती आहे कि, या चित्रपटामध्ये सोनमची स्टाइलिश रियाच होती. रिया ही स्टायलिश आहे पण तिने ‘वेक उप सिड’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि कोंकणा सेन शर्मा सारख्या कलाकारांसोबत सहायक निर्देशक म्हणून काम केले आहे. रिया ही व्यवसायाने प्रोड्युसर आहे आणि तिने ‘आइशा’ चित्रपट प्रोड्युस केला आहे.