KGF मधल्या रॉकीची आई पहा

कलाकार

बरेच चित्रपट असे असतात जे आपण हिंदी मध्ये डब करून बघतो आणि तरीही ते खूप प्रसिद्ध होतात आणि लोकांच्या पसंतीसही पडतात. त्यातलाच एक आहे जो एकदम सुपरहिट झाला तो म्हणजे केजीफ १ (KGF-1). केजीफचे दोन भाग आले आणि केजीफ २ पण खूप प्रसिद्ध झाला. यामध्ये रॉकी नावाचा एक मुलगा गरिबीमध्ये जन्म घेतो.

तो १९६० मध्ये त्याची शक्ती दाखवायला आणि संपत्ती साठी मुंबईला येतो. हे तो त्याच्या आईला करतो. हा चित्रपट पूर्णपणे रॉकी या नावाच्या अवतीभोवती आहे. नंतर रॉकी गरुडाला कसे मारतो याबद्दलची कहाणी या चित्रपटात आहे. जेव्हा केजीफ १ रिलीज झाला तेव्हा तो कन्नड मध्ये झाला नंतर या चित्रपटाचे डबिंग तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत केले गेले.

यामुळे जनतेचा खूप प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने कन्नड सिनेसृष्टीत सगळ्यात जास्त कमाई केली आहे. आपण आज इथे या चित्रपटातील रॉकीच्या आईबद्दल माहिती घेणार आहोत. रॉकीची आई म्हणजेच शांतम्मा. शांतम्माचे खरे नाव अभिनेत्री अर्चना जॉईस आहे. अर्चना एक भारतीय अभिनेत्री असून तिने जास्तकरून कन्नड सिनेसृष्टीत काम केले आहे.

तिने केजीफच्या दोन्हीही भागात अभिनय केला आहे. तसेच तिने विजयरथा, नकशे, कलांतक यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अर्चनाचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला. तिचे लग्नही झाले आहे आणि नवऱ्याचे नाव श्रेयस उडुपा असे आहे. केजीफ या चित्रपटासाठी तिला बेस्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कारही भेटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *