अनुष्काने केला खूप मोठा खुलासा, सलमानच्या या वाईट सवयीमुळे लग्नात बोलवले नव्हते

कलाकार

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांचे लग्न झाले. हे दोघेही नुकतेच आईवडील झाले आहेत. अनुष्काने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या या मुलीचा जन्म ११ जानेवारीला झाला आणि विराट कोहली आणि अनुष्काचे लग्न गेल्या वर्षी ११ डिसेंबरला झाले. अनुष्का आणि विराट यांनी इटली मधल्या टस्कनीच्या एका रेसॉर्टमध्ये सोमवारी लग्न केले. लग्नाच्या वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी जास्त कोणाला आमंत्रण दिले नाही.

लग्नस्थळी काही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त केला होता. बातम्यांनुसार असे समोर आले आहे की, हॉटेलच्या संरक्षणासाठी एक टीम ठेवली होती जेणेकरून कोणीही त्या ठिकाणी आत जाऊ नये. याप्रमाणे अनुष्का आणि विराट यांनी गुपचूप इटलीमध्ये लग्न केले आणि फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न केले गेले. हे एक पहिलेच असे लग्न असेल जे ५० लोकांच्या उपस्थितीत झाले परंतु त्यांच्यावर करोडो रुपये खर्च केले गेले. लग्नानंतर एक मोठे रिसेप्शन मुंबईमध्ये आयोजित केले होते.

रिसेप्शन मध्ये बॉलीवूडपासून क्रिकेट क्षेत्रातील सर्व खेळाडूंना आमंत्रण दिले होते. तिकडे एवढे मोठे मोठे कलाकार गेले पण बॉलीवूडचे दबंग सलमान खान या कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यांना आमंत्रण का दिले गेले नव्हते? अशी काय गोष्ट आहे ज्यामुळे सलमान त्या कार्यक्रमात आपल्याला दिसले नाहीत. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की, विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दबंग खानला का नाही बोलवले. ज्यावेळी मीडियाला समजले की, सर्व कलाकार आले आहेत पण बॉलीवूड दबंग खान आले नाहीत तर सगळ्यांचे लक्ष त्याच गोष्टीकडे होते की सलमान खान का नाही आले.

आलेले पाहुणे सोडून मीडिया सलमान खान का त्या कार्यक्रमाला आले नाहीत याचा शोध घेऊ लागली. अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे अनुष्का आणि विराटने इटलीमध्ये जाऊन लग्न केले तेही कोणाला न बोलवता आणि बॉलीवूडमधल्या दबंग खानला सोडून सर्व कलाकारांना पार्टीला बोलवण्यात आले. यावर अनुष्काने आता एक मोठा खुलासा केला आहे. अनुष्का आणि सलमान खान यांचे बॉलीवूडमधले संबंध खूप चांगले आहेत पण एका शोमध्ये सलमान विराट कोहलीला असे काही बोलले ज्यामुळे विराटला वाईट वाटले. तेव्हापासून विराट आणि सलमान खान यांच्यात अंतर पडले. आणि यामुळेच अनुष्काने त्यांच्या लग्नात सलमान खानला बोलवले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *