कलर्स मराठीवर काही दिवसांपासून एक नवीन मालिका प्रसारित होत आहे. मालिका जेव्हा येणार होती त्यावेळी मालिकेच्या प्रोमोनेच सर्वांचे मन वेधून घेतले होते. मालिके कधी चालू होईल याची सर्वजण वाट पाहत होते. महाराष्ट्रातील बराच भाग हा वारकरी संप्रदाय असल्याने महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण असते. त्या मालिकेच्या प्रोमोनेही असाच काही प्रभाव टाकला आणि प्रेक्षकांना भक्तिमय बनवले आहे. त्या मालिकेचे नाव ‘जय जय स्वामी समर्थ’ आहे. या मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत श्री स्वामी समर्थ यांचे चरित्र सर्वांना बघायला मिळणार आहे.
या मालिकेत प्रमुख भूमिकेत म्हणजेच स्वामी समर्थांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अक्षय मुडावदकर आहेत. अक्षय हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्यांनी याआधी बऱ्याच मालिकांमध्ये आणि नाटकात काम केले आहे. या मालिकेत स्वामी भक्त चंदा नावाची मुलगी आहे जीला वेळोवेळी स्वामी समर्थ मदत करत असतात. निस्वार्थ भावाने केलेली भक्ती ही कशी फळ देते हे, या मालिकेतून आपल्याला समजून येईल. आपण येथे चंदाच्या खऱ्या आयुष्यातील माहिती घेणार आहोत.
या चंदाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे विजया बाबर. विजयाचा जन्म १९ ऑक्टोबर १९९९ ला झाला. ती सध्या मुंबई वास्तव्यास आहे. प्रसारित झालेल्या पहिल्याच एपिसोडमध्ये विजयाने प्रेक्षकांना तिच्या अभिनयाने मोहित केले. विजयाची ही पहिलीच मालिका आहे. विजया ही एक थिएटर अभिनेत्री आहे. ‘शिकस्त ईश्क, सिंड्रेल्ला’ यांसारख्या नाटकातही तिने आधी काम केले आहे. या नाटकांना सर्वोत्कृष्ट नाटके म्हणूनही गौरविण्यात आले होते.
यासोबतच तिने ‘मिस मुंबई २०१५’ चा पुरस्कारही मिळवला आहे. नवी मुंबईतील पिल्लई कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये तिने बऱ्याच नाटकातही सहभाग घेतला होता. सध्या ती कलर्स मराठीच्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेमध्ये चंदाची भूमिका साकारत आहे. तुम्हालाही तिचा अभिनय कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा.