आपल्या देशात विविध जातीधर्माच्या व्यक्ती राहतात. या जातीधर्मानुसार त्यांचे कार्यक्रम तसेच रूढी परंपरा सुद्धा बदलतात. लग्नसोहळा, गणपती उत्सव, दसरा, जयंती वगैरे अशा अनेक छोट्यामोठ्या कार्यक्रमासाठी डीजे किंवा बँजो असतो आणि त्यांच्याशिवाय हे सण अधुरेच असतात. जोवर डीजेच्या तालावर नाचत नाही तोवर काही जणांचे समाधान नाही होत.
अश्या व्यक्ती एकदा का डीजेचे संगीत चालू झाले की नाचायला लागतात ते त्यांना काही भानच नाही राहत. अतिशय मग्न होऊन नाचत असतात. असे अनेक विडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत त्यातलाच एक व्हिडिओ तुमच्या मनोरंजनासाठी इथे घेऊन आलो आहे. बऱ्याच कार्यक्रमात डीजे किंवा बँजोबरोबर काही मुली किंवा महिला सुद्धा नाचण्यासाठी बोलवल्या जातात.
तसेच तुम्हाला या व्हिडिओत सुद्धा दिसेल. इथे ‘गार डोंगराची हवा अन बाईला सोसना गारवा’ या गाण्यावर एका लहान मुलाचा आणि एका मुरलीचा डान्स नाही तर डान्सची जुगलबंदी पाहायला मिळेल. हा मुलगा त्यांच्या ग्रुपमधला नाही. त्याला नाचू वाटले त्यामुळे तो पुढे आला आणि नाचत आहे. या गाण्यातील ती गायिका त्याला नाचायचे आहे का हे सुद्धा विचारताना तुम्हाला दिसेल.
तो मुलगा त्या क्षणी हजरजबाबीने डान्स करत आहे. ती महिला ज्याप्रमाणे डान्स करते, तिला शोभेल अशा स्टेप्स तोही करत आहे. संगीत जसे हळू किंवा फास्ट होत असेल त्यानुसारही तो त्याचा डान्स करत आहे. बाकीचे मंडळी त्याचा आणि त्या महिलेचा डान्स पाहून चांगलाच आनंद घेत आहेत. तो मुलगा डान्स करून एवढा थकला नाही परंतु ती महिला तुम्हाला थकल्यासारखी वाटेल. शेवटी लहान मुलांना खूप जोश असतो. मित्रांनो, तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
पहा व्हिडीओ: