लहानपणी शाळेचे गॅदरिंग म्हणले की किती मजा यायची. गॅदरिंगला काहीजण वार्षिक स्नेहसंमेलन असेही म्हणतात. या स्नेहसंमेलनाची तयारी शाळेमध्ये महिनाभर आधीच चालू असते. यामध्ये आयोजन करणाऱ्या सर किंवा मॅडम पेक्षा भाग घेणारे मुलेमुलीच खूप उत्साही असतात. काहीजण तर या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतात.
कोणाला या कार्यक्रमात त्याचा डान्स दाखवायचा असतो तर कोणाला त्याचे नाटक. तुम्हालाही तुमचे लहानपणीचे दिवस आठवले असतील ना? भलेही तुम्ही पुढे जाऊन स्टेजवर डान्स केला नसेल परंतु या सर्व गोष्टी समोर तर नक्कीच पाहिल्या असतील. डान्सच्या सरावापासून ते कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी गोळा करण्यात काही वेगळीच मजा असते.
या काळात तर अभ्यासाची चांगलीच बोंब होत असायची. काहीनी तर लहान असताना आपल्या आईकडे खूप हट्टही केला असेल की मला तसेच कपडे डान्स करताना घालायचे आहेत किंवा काहींनी तक्रार केली असेल की मला डान्स करताना ग्रुपमध्ये पुढे नाही उभा राहू दिले. हाहा!!! खरंच लहानपण खूपच रम्य असते.
तुमच्या या आठवणींना उजाळा देण्यासाठी असाच एक लहान मुलामुलींचा गॅदरिंग मधला विडिओ की तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील जिल्हा परिषद शाळेचा आहे. हा मुलामुलींचा ग्रुप पहिली इयत्तेमधील आहे आणि तुम्ही बघाल तर अगदी तुमच्या लहानपणीची आठवण येईल.
डान्स करायची इच्छा तर खूप असते परंतु डान्स स्टेप लक्षात नाही राहत आणि त्यामुळे दुसऱ्याचे बघून पूर्ण गाण्यावर नाचतो. तसेच काहीसे तुम्ही यातही पाहाल. या मुलांनी त्यांच्या वयाच्या मानाने ‘मंदामाई शिकलेली नव्हती का’ या गाण्यावर खूप चांगला डान्स केला आहे. खरच यांनी आज बालपण आठवून दिले. तुमच्या या बद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा.
पहा व्हिडीओ: