सगळे मिळून घेणार अवनीची काळजी बाळ आहे सुखरूप

कलाकार

स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सध्या अवनी ही गरो’दर आहे असे दाखवले जात आहे. या मालिकेच्या १९ जुलैच्या भागात तुम्हाला दिसणार आहे की, ज्यावेळी अवनी, वैभव आणि सरिता बाहेर बसलेले असतात तेव्हा न’र्स येऊन त्यांना म्हणते की, ‘तुम्हाला डॉ’क्टरांनी बोलवले आहे.’

मग सरिता वहिनी आणि वैभव हे दोघेही अवनीला घेऊन डॉ’क्टरांकडे जातात. डॉ’क्टरांच्या केबिनमध्ये जाऊन वैभव आणि अवनी खुर्चीवर बसतात आणि सरिता उभा राहते. वैभव डॉ’क्टरांना विचारतो की, ‘डॉ’क्टर काय झाले? सो’नोग्रा’फीचा काय रि’पोर्ट आला? सगळं आहे ना व्यवस्थित.’ यावर डॉ’क्टर या वैभवकडे बघत बसतात.

नंतर सर्वांना ऐकून आनंद होतो की, अवनी आणि बाळ हे दोघेही सुरक्षित आहेत. डॉ’क्टर सांगतात की, अवनीची आता जास्त काळजी घेतली पाहिजे. घरी आल्यानंतर सरिता रडत असते आणि ते पाहून सुर्या तिला तिच्या रड’ण्यामागचे कारण विचारतो. तर सरिता म्हणते की, ‘ही माझ्याच पा’पांची अवनीला शि’क्षा होत आहे.’ सूर्याने कोणते पाप म्हणून विचारल्यावर सरिता बोलते की, ‘मी एक जीव नाकारला होता आणि त्यामुळे असे होत आहे.’

हीच शिक्षा अवनीला मिळत आहे की काय असे सरिताला वाटत असते. इकडे ज्यावेळी अंजी स्वयंपाक घरात येते तेव्हा सरिता तिला बोलते की, ‘अवनीच्या बाबतीत आता तुझी मनमानी मी सहन नाही करून घेणार. अवनी काय खाणार, काय पिणार हे मी ठरवणार. आतापासून तुला किचनमध्ये एन्ट्री बंद आहे.’ हे ऐकून अंजीला खूप वाईट वाटते. तुमच्याही याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *