प्रत्येक भारतीयाला आपल्या भाषेवर, संस्कृतीवर तसेच भारतातील प्रत्येक गोष्टीवर जीवापाड प्रेम असते. असे अनेक लोक आहेत ज्यांनी भारतीय संस्कृतीचा वारसा परदेशात अनेक ठिकाणी पुढे नेला आहे. भारतीय संस्कृती ही जगामध्ये खुपच प्रिय आहे. आजही अनेक तरुण आपल्या या संस्कृतीचा विस्तार करत आहेत आणि त्याचेच एक उत्तम उदाहरण आज इथे मी तुम्हाला देणार आहे.
मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हीला नक्कीच भारतीय असल्याचा गर्व वाटेल. तुम्हालाही या सर्वांबरोबर ढोलताशे वाजवावे असे वाटेल. भारतामध्ये अनेक सणांसाठी ढोलताशे वाजवले जातात. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव असेल त्यावेळी हा सण ढोलताशांशिवाय अधुराच आहे, हो ना?? असाच एक अभिमान वाटेल असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
व्हिडिओमध्ये पाहिले तर तुम्हाला दिसेल की काही भारतीय तरुण मुली आणि मुलं चक्क परदेशात रोडवरून ढोलताशांच्या गजरात एक मिरवणूक काढताना दिसत आहेत. यांनी अगदी त्यांचा पोशाख सुद्धा महाराष्ट्रयीन ठेवला आहे. मुलींनी हिरव्या साडीचा काष्ठा, नाकात नथ, गळ्यातले आणि डोक्यावर केशरी फेटा आणि मुलांनी केशरी फेटयाबरोबर पांढरा ड्रेस असा हा मराठमोळा साज परदेशात अगदी शोभून दिसत आहे.
हे पाहून कोणालाही गर्व वाटेल. आजूबाजूला पाहणारे परदेशातील लोक या मिरवणुकीचा विडिओ काढत आहेत तर काहीजण फोटो तर बरेच जण आश्चर्याने ती मिरणवुक बघत आहेत. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून आपण मराठी असल्याचा गर्व वाटला का? आम्हाला तुमच्या भावना कमेंटद्वारे नक्की कळवा.
पहा व्हिडीओ: